शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उदयनराजेंचे वागणं जुनंच.. गरज सरो अन् वैद्य मरो : शिवेंद्रसिंहराजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 16:12 IST

रामराजे आणि उदयनराजे यांच्यातील वादाशी माझा दूरवर कसलाही संबंध नाही. त्यामुळे माझे आणि रामराजेंचे सेटिंग, संगनमत आहे, हे खासदारांचे विधान हास्यास्पद आहे. माझे सेटिंग फक्त सातारा आणि जावळीतील जनतेशी आहे आणि तेही आपुलकी, प्रेम आणि विकासकामांपुरते आहे. गरज सरो अन् वैद्य मरो, ही खासदारांची जुनी सवय असून, त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा सातारकरांना येत आहे, असा टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लगावला आहे.

ठळक मुद्देउदयनराजेंचे वागणं जुनंच.. गरज सरो अन् वैद्य मरो : शिवेंद्रसिंहराजे सातारा-जावळीतील जनतेशी आपुलकीचं सेटिंग

सातारा : रामराजे आणि उदयनराजे यांच्यातील वादाशी माझा दूरवर कसलाही संबंध नाही. त्यामुळे माझे आणि रामराजेंचे सेटिंग, संगनमत आहे, हे खासदारांचे विधान हास्यास्पद आहे. माझे सेटिंग फक्त सातारा आणि जावळीतील जनतेशी आहे आणि तेही आपुलकी, प्रेम आणि विकासकामांपुरते आहे. गरज सरो अन् वैद्य मरो, ही खासदारांची जुनी सवय असून, त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा सातारकरांना येत आहे, असा टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लगावला आहे.खा. उदयनराजे भोसले यांनी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना आ. शिवेंद्रसिंहराजे आणि रामराजे यांच्यात संगनमत असल्याचे वक्तव्य केले होते. यासंदर्भात आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्टीकरण दिले. लोकसभा निवडणुकीत मी पक्षाशी प्रामाणिक राहून उदयनराजेंचे काम केले. माझ्या मतदारसंघातून मिळालेल्या मताधिक्यावरून ते सिद्ध होत असून, सातारकर जनतेनेही हे पाहिले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या आधी अगदी नगरपालिकेच्या निवडणुकीवेळी खा. उदयनराजेंची भाषा आणि वागणे कसे होते, हे जनतेला चांगलेच माहिती आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांच्यात कसा आणि किती फरक पडला, हेही जनतेने जवळून पाहिले आहे आणि लोकसभेच्या निकालानंतर त्यांच्या वागण्यात, बोलण्यात काय बदल झाला आहे, हे सगळ्यांनाच दिसत आहे.

नीरा-देवघरच्या पाण्याशी माझा आणि माझ्या मतदार संघाचा काहीही संबंध नाही. त्यामुळे उदयनराजे आणि रामराजे यांच्यात सुरू असलेले भांडण कशासाठी आहे, हे मला माहिती नाही आणि माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही.लोकसभा निवडणुकीनंतर माझ्या मतदारसंघात ज्या काही गोष्टी मला जाणवल्या, त्या मी पक्षश्रेष्ठी शरद पवार यांच्या कानावर घातल्या. मी काम केलं का नाही, हे जनतेने पाहिले आहे आणि मताधिक्यावरूनही स्पष्ट झाले आहे. लोकसभा निवडणुकीत उदयनराजे जे बोलत होते, त्याप्रमाणे त्यांनी वागणे अपेक्षित आहे.माझा काय संंबंध...?कोण कसं वागतंय, हे सातारकरांनी व सातारा-जावळीतील जनतेनं बघावं. कोणं कसं बदललंय, हेही पाहावं. मी सातारा- जावळीतील जनतेशी नेहमीच बांधील राहिलो आहे आणि यापुढेही कायम बांधील राहणार आहे. सातारकर आणि माझ्या मतदार संघातील जनतेमुळेच मी आहे. हे मी कदापि विसरत नाही आणि त्यामुळेच माझ्या वागण्यात आणि बोलण्यात कधीही बदल दिसणार नाही. त्यामुळे खासदारांनी संबंध नसलेल्या गोष्टींशी माझा संबंध लावू नये आणि उगाच दिशाभूल करू नये, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :Shivendrasinghraja Bhosaleशिवेंंद्रसिंहराजे भोसलेUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेSatara areaसातारा परिसर