शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
3
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
4
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
5
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
6
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
7
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
8
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
9
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
10
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
11
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
12
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
13
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
14
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
15
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
16
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
17
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
18
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
19
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
20
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा

पक्षकार्याच्या धामधुमीत उदयनराजेंचे ‘पक्षी’कार्य!

By admin | Updated: October 9, 2014 23:07 IST

मांजाने जखमी झालेल्या ब्रह्मी घारीची शुश्रुषा

सातारा : विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना आणि पक्षाच्या प्रचारासाठी पायाला भिंगरी लागलेली असतानाच खासदार उदयनराजे भोसले यांनी आज ‘पक्षी’कार्य केले. पतंगाच्या मांजात गुंतून पडलेल्या ब्रह्मी घारीला जीवदान देऊन तिची शुश्रुषा केली आणि तिला वन अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले. सकाळी साडेअकराच्या सुमारास खासदार उदयनराजे प्रचारासाठी बाहेर पडण्याच्या तयारीत असतानाच ‘जलमंदिर पॅलेस’ या त्यांच्या निवासस्थानी छपरालगत ब्रह्मी घार अडकून पडल्याचे त्यांना दिसले. त्यांनी तत्काळ कर्मचाऱ्यांना बोलावून त्या धडपडणाऱ्या घारीला खाली उतरविले. पतंगाच्या मांजात ती अडकली होती. त्या गुंत्यातून तिला सोडवून त्यांनी पशुवैद्यकीय डॉक्टरांना निरोप पाठविला. डॉक्टरांनी सुचविलेली औषधे जवळच्या जनावरांच्या औषधालयातून मागवून घेतली आणि उपचार पूर्ण झाल्यावर वन अधिकाऱ्यांना बोलावून घेतले.सातारा क्षेत्राचे वनपाल सुनील भोसले आणि वनरक्षक दीपक गायकवाड यांनी जलमंदिर येथे जाऊन घारीला ताब्यात घेतले. आणखी उपचारांची गरज लक्षात घेऊन त्यांनी घारीला गोडोली येथील रोपवाटिकेत आणले. दुपारपर्यंत विश्रांती घेऊन घार ताजीतवानी झाली. तीनच्या सुमारास फोटोग्राफरला एक छानशी ‘पोझ’ दिल्यानंतर घार आकाशात झेपावली. ब्रह्मी घार ही साध्या घारीपेक्षा थोडी वेगळी असून, तिचे धड शुभ्र पांढरे आणि पंख तपकिरी रंगाचे असतात. उंच झाडांवर राहणारी ब्रह्मी घार आकाशातही इतर पक्ष्यांपेक्षा जास्त उंच तरंगत राहते. मात्र, इतक्या उंच जाऊनही ती आपले भक्ष्य अचूक पकडते. (प्रतिनिधी)