शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

उदयनराजेंची टोल नाक्यावर एंट्री ! प्रशासन हतबल, चार तास वाहनांना टोल-फ्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 22:44 IST

साता-याचे खासदार उदयनराजे भोसले हे आपल्या आक्रमक शैलीमुळे नेहमीच चर्चेत असतात. गुरुवारी त्यांनी कार्यकर्त्यांसह पुणे-बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी टोल नाक्यावर एंट्री मारली आणि चार तास टोल फ्री झाल्याने वाहनधारकांची चंगळ झाली.

पाचवड (जि. सातारा) : साता-याचे खासदार उदयनराजे भोसले हे आपल्या आक्रमक शैलीमुळे नेहमीच चर्चेत असतात. गुरुवारी त्यांनी कार्यकर्त्यांसह पुणे-बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी टोल नाक्यावर एंट्री मारली आणि चार तास टोल फ्री झाल्याने वाहनधारकांची चंगळ झाली. ही वार्ता समजताच कार्यकर्ते धडक मारल्याने पुण्याजवळील खेड-शिवापूरचा टोलनाकाही टोल फ्री करण्यात आला.त्याचे झाले असे... आनेवाडी टोलनाक्यावरील प्रशासन बदलल्याच्या पार्श्वभूमीवर साता-याचे  खासदार उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी सायंकाळी सहा वाजता अचानक टोल नाक्यावर दोनशे कार्यकर्त्यांसह एंट्री मारली. त्यानंतर त्यांनी टोल वसुली बंद करीत सर्व वाहने टोल फ्री केली. त्यामुळे टोल नाक्यावर काहीवेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. चार तासांहून अधिक वेळ वाहने फ्री सोडण्यात आली.आनेवाडी टोल नाक्याचे व्यवस्थापन बदलणार अशी चर्चा गेले महिनाभर सुरू आहे. टोल वसुलीचे अधिकार अशोका स्थापत्य कंपनीकडून काढून घेत कोल्हापूर येथील मॅक्रोलाईन कंपनीकडे देण्यात आले. यापार्श्वभूमीवर उदयनराजे टोल नाक्यावर पोहोचले. त्यांना पाहून टोलनाक्यावरील व्यवस्थापनही खडबडून जागे झाले. ‘मी इथे तोडफोड करण्यासाठी आलो नाही. मला मारायचं असेल तर मारा. पण मानहानी सहन करणार नाही. माझे किती नुकसान व्हायचे ते होऊ दे, मी त्याला भीत नाही. माझ्या लोकांच्यावर होणारा अन्याय मी सहन करणार नाही व होऊ देणार नाही. अजूनही मी संयम ठेवून आहे.’ असे टोलनाका व्यवस्थापनाला सुनावल्यानंतर उदयनराजेंनी सर्व वाहने टोल न घेताच सोडून देण्यास सांगितले. त्यानंतर काहीवेळातच टोल व्यवस्थापनाने वाहने टोल न घेताच सोडण्यास सुरुवात केली.अचानक घडलेल्या या प्रकारामुळे टोलनाका व्यवस्थापन गांगरून गेले. उदयनराजे टोलनाक्याच्या मधोमध उभे होते. सुमारे अडीच तास त्यांनी टोलनाक्यावर तळ ठोकला. त्यानंतर ‘इथून हलू नका, मी अर्ध्या तासात परत येतोय, मग बघू काय करायचे ते,’ असे कार्यकर्त्यांना सांगून मोटारीने ते साता-याकडे रवाना झाले.खेड-शिवापूर टोलनाकाही झाला फ्रीखासदार उदयनराजेंनी आनेवाडी टोलनाका टोल फ्री करण्यास भाग पाडल्यानंतर काहीवेळातच खेड-शिवापूरचा टोलनाकाही टोल फ्री करण्यात आला.सीसीटीव्ही केले बंदआनेवाडी टोलनाक्यावर सर्व वाहने फ्री सोडण्यात येण्यापूर्वी टोलनाक्यावरील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बंद करण्यात आले. एवढेच नव्हे तर तेथे उपस्थित असणा-यांना आपल्या मोबाईलमध्ये फोटो किंवा व्हिडिओ शुटिंग करण्यासही मनाई करण्यात आली. उदयनराजेंचे कार्यकर्ते कोण फोटो काढतेय का? यावर लक्ष ठेवून होते.

‘इनकमिंग’ बंद झाल्यामुळे पवार साहेबांच्या गाडीत ‘इनकमिंग’ बंद झाल्यानेच उदयनराजे पवार साहेबांच्या गाडीत जाऊन बसले. लोकसभा निवडणूक जवळ आली आहे, आता अडचणी दिसत आहेत. त्यामुळे पवार साहेबांच्या ‘गुडबुक’मध्ये जाऊन बसावं, असा त्यांचा हेतू आहे. तो साध्य करण्यासाठी चालकाशेजारी का होईना, पण त्यांनी पवार साहेबांच्यासोबत प्रवास केला,’ अशी खिल्ली आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उदयनराजे उडविली. सुरुची येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसले