शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

उदयनराजेंचे रिंगमास्टर बारामतीकर पवार : पंजाबराव पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 14:54 IST

साताऱ्याच्या राजकारणाचे व अर्थकारणाचे सर्व निर्णय हे बारामतीत बसून खासदार शरद पवार हेच घेत असतात. दि गे्रट सातारा सर्कशीत उदयनराजेंसह सर्वच आमदार मंडळींचे बारामतीकर पवार हे रिंगमास्टर आहेत, अशी बोचरी टीका बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.

ठळक मुद्देउदयनराजेंचे रिंगमास्टर बारामतीकर पवार : पंजाबराव पाटील सरदार, जहागिरदारांनी जिल्ह्याची वाट लावल्याची टीका

सातारा : साताऱ्याच्या राजकारणाचे व अर्थकारणाचे सर्व निर्णय हे बारामतीत बसून खासदार शरद पवार हेच घेत असतात. दि गे्रट सातारा सर्कशीत उदयनराजेंसह सर्वच आमदार मंडळींचे बारामतीकर पवार हे रिंगमास्टर आहेत, अशी बोचरी टीका बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.बळीराजा शेतकरी संघटनेतर्फे सातारा, हातकणंगले, माढा, सांगली, कोल्हापूर व उस्मानाबाद हे सहा लोकसभा मतदारसंघ लढविण्यात येणार आहेत, याची माहिती देण्यासाठी पाटील यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. या बैठकीत त्यांनी राष्ट्रवादी, काँगे्ससह विद्यमान भाजप सरकारच्या धोरणांवर चौफेर टीका केली.पाटील म्हणाले, जिल्ह्यातील सर्वच सत्तास्थाने ही पवारांच्या अधिपत्त्याखाली आहेत. स्थानिक नेतेमंडळींना मात्र कोणतेही निर्णय घेता येत नाहीत, सर्व निर्णय हे बारामतीमधून होत असतात. जिल्ह्यातील राजकारणाची काडीही शरद पवारांच्याशिवाय हालत नाही. सरदार, जहागिरदार, राजे यांना पवारांनी सत्तास्थानी बसविले आहे. त्यामुळे जिल्ह्याची पूर्णत: वाट लागलेली आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन भूमाता दिंडी काढली. परंतु या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कोणताही पाठपुरावा केला नाही, त्यांनी शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग केला आहे. कऱ्हाड दक्षिण, कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघात तर त्यांनी दर्शनही दिले नसल्याने जनतेत नाराजीची भावना आहे. माजी खासदार श्रीनिवास पाटील हा चांगला माणूस असला तरी पवारांच्या सांगण्यानुसारच त्यांचेही राजकारण सुरु राहिले. १0 वर्षात एकही मोठा प्रकल्प सातारा जिल्ह्यात त्यांनी आणला नाही.शेतकरी संसदेत निवडून गेल्याशिवाय प्रश्न सुटणार नाहीत, असे सांगताना पाटील यांनी खा. राजू शेट्टी व आ. बच्चू कडू यांच्या कामाचे कौतुक केले. मात्र हातकणंगले मतदारसंघात खा. राजू शेट्टी यांना विरोध का करता? असे विचारले असता हातकणंगले व माढा लोकसभा मतदारसंघात आम्ही त्यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेणार आहोत, असे ते म्हणाले.

सातारा लोकसभा मतदारसंघात पंजाबराव पाटील स्वत: उमेदवारी करणार असून हातकणंगले बी. जी. पाटील, माढा लोकसभा मतदारसंघात संजय पाटील घाटनेकर, सांगलीतून डॉ. उन्मेश देशमुख, कोल्हापूरातून नितीन पाटील, उस्मानाबादमधून भीमाशंकर बिराजदार यांची नावे लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून घोषित केली.चौकट..उदयनराजे खासदार म्हणून नापासजिल्ह्यातील शरयू, जरंडेश्वर हे कारखाने पवारांच्या ताब्यात असल्याने शेतकºयांना ऊस दर मिळण्यात अडचणी येतात. जिल्ह्यातील इतर साखर कारखान्यांवर पवारांचा दबाव असतो. त्यामुळे ते कारखाने शेतकºयाला दर देऊ शकत नाहीत, शेतमालालाही हमीभाव मिळत नाही. केंद्र सरकार जीवनावश्यक वस्तुंच्या कायद्याचा गैरवापर करत आहे, ही सर्व परिस्थिती उदयनराजे बदलतील, असे वाटले होते, मात्र ते खासदार म्हणून पुर्नत: नापास ठरले, अशी टीकाही पाटील यांनी केली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Satara areaसातारा परिसर