शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

उदयनराजेंचा शिवेंद्रराजेंना टोला, म्हणाले,' मनात खोट असणारेच गरळ ओकतायत, त्यांची अवस्था खाई त्याला खवखवे अशीच'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 20:50 IST

Satara Politics News: खाई त्याला खवखवे या उक्तीप्रमाणे, उदयनराजे कोण असा प्रतिप्रश्न ते करीत असतील तर त्यांच्याच मनात खोट आहे. म्हणूनच त्यांनी गरळ ओकली आहे असा घणाघात खासदार उदयनराजे भोसले यांनी केला.

सातारा - सहकारी संस्था या सभासद जनतेच्या सर्वांगीण विकासाकरिता स्थापन केल्या जातात. सभासदांचे जीवनमान उंचावणे हे सहकाराचे मूलतत्त्व किंवा गाभा आहे. सहकार तत्त्वांना तिलांजली देत, महाराष्ट्रात काही सहकारी संस्था कशा गिळंकृत केल्या गेल्या याविषयी वस्तुस्थिती मांडली. जे प्रकार घडले आहेत, त्याची आम्ही फक्त जाहीर वाच्यता केली. या वाच्यतेमध्ये कोणत्याच आमदारांचा किंवा कोणत्या कारखान्याचा नामोल्लेख आम्ही केलेला नव्हता, तथापि खाई त्याला खवखवे या उक्तीप्रमाणे, उदयनराजे कोण असा प्रतिप्रश्न ते करीत असतील तर त्यांच्याच मनात खोट आहे. म्हणूनच त्यांनी गरळ ओकली आहे असा घणाघात खासदार उदयनराजे भोसले यांनी केला.

खासदार उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, आपल्या राज्यात, देशात सहकारी तत्त्वावर स्थापन झालेल्या संस्था कशा मोडीत काढल्या गेल्या आहेत हे सर्वांच्या समोर आहे. सहकारी संस्थांतील सभासद मालक सभासद असूनही, स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थापोटी त्यांची कशी कामगार-मजुराप्रमाणे पिळवणूक केली जाते याचीही अनेक उदाहरणे आहेत. अशा सहकारी संस्थांतील भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढणार, सहकारी संस्थांचे सभासद जे खरे मालक आहेत, त्यांनी आपल्या मालकी अधिकारांचा वेळीच वापर करून अशा स्वाहाकारी आणि स्वार्थी विचारधारेच्या व्यक्तींकडून संस्था खाजगीकरण होण्यापूर्वी सभासदांनी ताब्यात घ्याव्यात असे सर्वसाधारण वक्तव्य केले होते.

आमचे ते वक्तव्य फक्त आणि फक्त यांनाच झोंबले. वास्तविक आमच्या सर्वसाधारण भाष्यावर त्यांनी इतकी आगपाखड करण्याचे कारण नव्हते. ते अगदी व्यक्तिगत बाबींवरही घसरल्याचे पहायला मिळाले. वय वाढले की बुद्धी भ्रष्ट होते अशी अजब संकल्पना मांडली. त्यांनी त्यांच्या पेक्षा सर्वच ज्येष्ठ असणाऱ्यांच्या बाबतीत त्यांची असलेली वैचारिक दिवाळखोरी याद्वारे दाखवून दिली. कदाचित मानसिक संतुलन तात्पुरते का होईना त्यांचे बिघडले असावे. वाढत्या वयाप्रमाणे प्रगल्भता वाढण्याऐवजी बालिशपणाच वाढला असल्याने दु:ख वाटते असे उपरोधक भाष्य उदयनराजेंनी केले आहे.

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसलेPoliticsराजकारण