शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

उदयनराजेंनी जनतेची जाहीर माफी मागावी: शिवेंद्रसिंहराजे भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 22:41 IST

सातारा : ‘खासदार उदयनराजे भोसले व कल्पनाराजे भोसले यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या पत्रामुळेच शहरातील पारंपरिक तळ्यातील विसर्जनावर बंदी आली. एकीकडे सांगायचं तळं आमच्या मालकीचं अन् दुसरीकडं तळ्यांवर बंदी आणायची, ही दुटप्पी भूमिका त्यांनी बदलायला हवी. जनतेच्या भावनांशी खेळून गैरसमज निर्माण करणाऱ्या खासदारांनी वस्तुस्थिती जनतेसमोर मांडून जाहीर माफी मागावी,’ अशी ...

सातारा : ‘खासदार उदयनराजे भोसले व कल्पनाराजे भोसले यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या पत्रामुळेच शहरातील पारंपरिक तळ्यातील विसर्जनावर बंदी आली. एकीकडे सांगायचं तळं आमच्या मालकीचं अन् दुसरीकडं तळ्यांवर बंदी आणायची, ही दुटप्पी भूमिका त्यांनी बदलायला हवी. जनतेच्या भावनांशी खेळून गैरसमज निर्माण करणाऱ्या खासदारांनी वस्तुस्थिती जनतेसमोर मांडून जाहीर माफी मागावी,’ अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत केली.ते म्हणाले, ‘गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील मंगळवार व मोती तळ्यात गणेशमूर्तींचे विसर्जन केले जात होते. याला पोलिसांची अन् प्रशासनाची कोणतीच हरकत नव्हती. मात्र, खासदार उदयनराजे भोसले यांनी मंगळवार तळ्यातील पाणी दूषित होत असल्याचं कारण पुढं करीत न्यायालयाशी पत्रव्यवहार करून विसर्जनाला बंदी आणली. भोसले व कल्पनाराजे यांनीही याबाबत जिल्हाधिकाºयांशी पत्रव्यहार केला होता, असा आरोप त्यांनी केला.’मंगळवार असो की मोती कोणत्याही तळ्याचं पाणी प्यायला वापरलं जात नव्हतं. तरीही पाणी दूषित होत असल्याचे कारण पुढे करण्यात आले. बाहेरच्या लोकांनी जर हे पत्र वाचलं तर त्यांना असं वाटलं की सातारकर याच तळ्यातील पाण्यावर जगतायत की काय? विसर्जन तळ्याच्या मुद्द्यावरून जनतेच्या भावनांशी सुरू केलेला खेळ त्यांनी आता बंद करावा. न्यायालयात दाखल केलेल्या दोन्ही पत्रांचा उदयनराजेंनी खुलासा करावा. वस्तुस्थिती काय आहे, हे स्पष्ट करून त्यांनी जनतेची जाहीर माफी मागावी. शहरात कायमस्वरूपी विसर्जन तळ्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी दिली.मुख्याधिकाºयांवर यांचाच दबाव..खासदार उदयनराजे भोसले व कल्पनाराजे भोसले यांनी सांगितल्यानेच तत्कालीन मुख्याधिकाºयांनी न्यायालयात तळ्यांबाबत पत्रव्यवहार केला. मुख्याधिकाºयांवर यांचाच दबाव होता, हे आता स्पष्ट झालं आहे. सातारा विकास आघाडी विसर्जनाबाबत नियोजन करायला कमी पडली आहे, हे त्यांनी मान्य करावे,’ असेही शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले.विसर्जनाचा मुद्दा बिकट झाला असताना नरड्याला आल्यावर तळ्याचं काम कराचयं हे चुकीचं आहे.मंगळवार तळे स्वच्छतेसाठी आम्ही प्रयत्न केले तेव्हा, आम्हाला मनोमिलन असूनही विरोध करण्यात आला.नरेंद्र दाभोलकरांच्या नावाने दिल्या जाणाºया पुरस्काराबाबत आता नगराध्यक्षांनाच विचारायला हवं.विकासकामांना महत्त्व देण्याऐवजी पालिकेत केवळ टोकाचं राजकारण सुरू आहे.सभेपूर्वी जे विषय अजेंड्यावर घेतले जातात ते विषय पुन्हा बदलले जातात. केवळ बहुमताच्या जोरावर विषय मंजूर केले जातात.