शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
4
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
5
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
8
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
10
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
11
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
12
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
13
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
14
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
15
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
20
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!

सातारचा पठ्या ऑलिम्पिक गाजवणार, उदयनराजेंनी भूमिपुत्राला दिल्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 12:56 IST

प्रवीण जाधव हा मुळचा फलटण तालुक्यातील सरडे गावचा रहिवासी असून त्याचे प्राथमिक शिक्षण गावातीलच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत झाले. त्याच्याकडील कौशल्य ओळखून शिक्षकांनी त्याला खेळासाठी प्रवृत्त केले.

ठळक मुद्देप्रवीण जाधव हा मुळचा फलटण तालुक्यातील सरडे गावचा रहिवासी असून त्याचे प्राथमिक शिक्षण गावातीलच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत झाले. त्याच्याकडील कौशल्य ओळखून शिक्षकांनी त्याला खेळासाठी प्रवृत्त केले.

सातारा - सातारचा सुपुत्र प्रविण जाधव टोकियो ऑलिंपिक तिरंदाजी स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. टोकियो ऑलिंपिक स्पर्धेतील तिरंदाजी संघात भारतीय संघातर्फे प्रविणची निवड झाल्याबद्दल खासदार उदयनराजे भोसले यांनी सोशल मीडियातून प्रविणचं कौतुक करत त्यास शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रवीणच्या संघर्षमय प्रवासाबद्दल त्याचं अभिनंदन केले. तसेच, प्रविणचा संघर्ष युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचंही मोदींनी म्हटलं आहे. 

प्रवीण जाधव हा मुळचा फलटण तालुक्यातील सरडे गावचा रहिवासी असून त्याचे प्राथमिक शिक्षण गावातीलच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत झाले. त्याच्याकडील कौशल्य ओळखून शिक्षकांनी त्याला खेळासाठी प्रवृत्त केले. नेमबाजीतील कौशल्यावर त्याची 2015 साली आंतरराष्ट्रीय ज्युनिअर कँपसाठी निवड झाली. त्यातूनच पुढे 2016 च्या आर्चरीच्या वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय वरिष्ठ संघात प्रवीणला संधी मिळाली होती. भारताच्या या नेमबाज खेळाडूला महाराष्ट्र शासनाच्या वतीने 2017-18 सालचा महाराष्ट्र राज्य क्रीडा क्षेत्रातील मानाचा "शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार" देऊनही गौरविण्यात आले आहे.  सातारचा हा पठ्ठ्या ऑलिंपिक स्पर्धेत देखील आपल्या दैदीप्यमान कामगिरीने भारतासह सातारा जिल्ह्याचे नाव देखील जगभरात अभिमानाने उंचावेल, यात शंका नाही. सातारच्या या सुपुत्राचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा, असे उदयनराजे यांनी म्हटलं आहे. 

मोदींनीही केलं कौतुक

भारताचा उत्कृष्ट तिरंदाज प्रवीण जाधव यांनी बिकट स्थितीवर मात करून क्रीडाकौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातल्या एका गावाचा रहिवासी असलेल्या प्रवीण याचे आईवडील मजुरी करून घर चालवितात. कष्टकऱ्याचा मुलगा भारतातर्फे ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहे, ही केवळ प्रवीण जाधव यांच्या आईवडिलांसाठीच नव्हे तर प्रत्येक  देशवासीयासाठी अभिमानाची गोष्ट आहे, असा गौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. ऑलिम्पिकसाठी जाणाऱ्या भारतीय खेळाडूंपैकी अनेकांचे जीवन सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे नरेंद्र मोदींनी मन की बात या कार्यक्रमात सांगितले.  

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेSatara areaसातारा परिसरMumbaiमुंबई