शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

दोन खटल्यांतून उदयनराजे निर्दोष

By admin | Updated: October 30, 2015 23:30 IST

न्यायालयाचा निकाल : मारहाण, अ‍ॅट्रॉसिटीच्या घटनांचा समावेश

सातारा : मारहाण आणि जातिवाचक शिवीगाळ केल्याच्या दोन विविध आरोपांतून खासदार उदयनराजे भोसले व इतरांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. यातील एक खटला २००४ मधील असून, दुसरी घटना २००७ मध्ये जिल्हा परिषद निवडणुकांच्या वेळी घडली होती. २००७ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीवेळी आमदार शशिकांत शिंदे यांचे स्वीय सहायक प्रदीप शिंदे यांना उदयनराजे भोसले, आसिफ शेख, पिनू चव्हाण, सचिन राजेशिर्के, सुशील मोझर, नरेंद्र बेलोशे यांनी मारहाण केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या खटल्यामध्ये न्यायालयाने खासदार उदयनराजेंसह वरील सहाजणांची निर्दोष मुक्तता केली. दुसरी घटना दि. ११ डिसेंबर २००४ रोजी घडली होती. संतोष कांबळे, संजय कांबळे या दोघा भावांना मारहाण व जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप उदयनराजे भोसले, नासिर शेख, तत्कालीन उपविभागीय अधिकारी बाळकृष्ण सोनवणे, अमरसिंह इंगळे व अन्य एकावर होता. या खटल्यातूनही उदयनराजेंसह वरील सहाजणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. या दोन्ही खटल्यांत बचाव पक्षातर्फे अ‍ॅड. ताहेर मणेर यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)