शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

चुकीच्या पद्धतीने काम केल्यास कदापि खपवून घेणार नाही- उदयनराजे भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 00:00 IST

सातारा : सातारा विकास आघाडीत सुरू असलेली अंतर्गत धुसफूस समोर आल्यानंतर दस्तुरखुद्द खासदार उदयनराजे भोसले यांनाच आघाडीच्या दोन्ही गटांची नाराजी दूर करावी लागली. सोमवारी जलमंदिर पॅलेस येथे झालेल्या बैठकीत उदयनराजे भोसले यांनी सर्वांचीच कानउघडणी केली. चुकीच्या पद्धतीने कोणी काम केल्यास खपवून घेणार नाही, असा इशाराही उदयनराजे यांनी दिला.पालिकेतील सत्तारूढ सातारा ...

ठळक मुद्दे साविआच्या नगरसेवकांची कानउघडणी

सातारा : सातारा विकास आघाडीत सुरू असलेली अंतर्गत धुसफूस समोर आल्यानंतर दस्तुरखुद्द खासदार उदयनराजे भोसले यांनाच आघाडीच्या दोन्ही गटांची नाराजी दूर करावी लागली. सोमवारी जलमंदिर पॅलेस येथे झालेल्या बैठकीत उदयनराजे भोसले यांनी सर्वांचीच कानउघडणी केली. चुकीच्या पद्धतीने कोणी काम केल्यास खपवून घेणार नाही, असा इशाराही उदयनराजे यांनी दिला.

पालिकेतील सत्तारूढ सातारा विकास आघाडीत गेल्या काही दिवसांपासून कोणत्या न कोणत्या कारणाने धुसफूस सुरू आहे. गटनेत्या स्मिता घोडके व नगराध्यक्षा माधवी कदम यांच्यात दोन गट पडल्याने हा विषय चर्चेला ठरला आहे. रविवारी आघाडीतील दोन्ही गटांची बाजू खासदार उदयनराजे भोसले यांनी ऐकून घेतली होती. यावेळी स्मिता घोडके यांनी नगराध्यक्षा चुकीच्या पद्धतीने कशा वागतात, हे उदयनराजेंसमोर मांडले होते. तर नगराध्यक्षांनी आपली बाजू ठामपणे मांडली होती.दरम्यान, दोन्ही गटांच्या नगरसेवकांना फटकारत उदयनराजे भोसले यांनी सोमवारी सकाळी जलमंदिर येथे दोन्ही नाराज गटांची बैठक बोलविली. या बैठकीत नगराध्यक्षा माधवी कदम व स्मिता घोडके यांच्या बाजूने नगरसेवकांनी उदयनराजे यांच्यासमोर आपापली मते मांडली. यावेळी नगराध्यक्षांच्या बाजूने नगरसेवकांची संख्या अधिक असल्याने त्यांचे पारडे जड होते.

नगराध्यक्षांची बाजू मांडताना महिला नगरसेविका म्हणाल्या, ‘आमचा कोणताही गट नाही. जनतेने निवडून दिल्याने त्यांच्याच कामांची चर्चा करण्यासाठी आम्ही नगराध्यक्षांच्या दालनात बसतो. आम्हाला स्वतंत्र दालन नाही. याचा वेगळा अर्थ काढला जातो. ‘नगराध्यक्षांचा बंदोबस्त करा’ म्हणजे नक्की काय करा? असा प्रश्नही यावेळी त्यांनी उपस्थित केला. दोन्ही गटांची बाजू ऐकून घेतल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी सर्वांनी पारदर्शी काम करावे, चुकीच्या कोणत्याच गोष्टी यापुढे खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा इशारा बैठकीत दिला.पदाचा मान राखा...आघाडीतील प्रत्येकाला पदे देण्यात आली आहे. या पदाचा मान राखून सर्वांनी शहराच्या विकासाला साजेसे काम करावे, असे यावेळी उदयनराजे भोसले म्हणाले. दरम्यान, सुमारे दीड तास झालेल्या या चर्चेनंतर नगराध्यक्षा माधवी कदम व स्मिता घोडके यांनी यापुढे एकमेकांना समजावून घेऊन व विचारविनिमय करून काम केले जाईल, अशी ग्वाही उदयनराजे भोसले यांना दिली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliticsराजकारण