शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

शिवेंद्रराजेंवरीलही अन्याय खपणार नाही : उदयनराजे भोसले -माणुसकीच्या भावनेतून माझं मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 23:06 IST

‘ज्या-ज्यावेळी लोकांवर अन्याय होतो, त्या-त्यावेळी माणुसकीच्या भावनेतून मी नेहमी त्या ठिकाणी माझं मत व्यक्त करतो. कोणीही असू द्या, मला अन्याय सहन होत नाही. शिवेंद्रसिंहराजेंवरही अन्याय झाला तरी मी

ठळक मुद्दे शिवेंद्रसिंहराजेंवरील अन्यायही मी खपवून घेणार नाही. तरीही प्रत्येकाने विचार करणे महत्त्वाचे आहे.मला दोषी पकडत असाल तर मी खऱ्या अर्थाने माझा दोष स्वीकारतो; पण मी अन्याय सहन करणार नाही,

सातारा : ‘ज्या-ज्यावेळी लोकांवर अन्याय होतो, त्या-त्यावेळी माणुसकीच्या भावनेतून मी नेहमी त्या ठिकाणी माझं मत व्यक्त करतो. कोणीही असू द्या, मला अन्याय सहन होत नाही. शिवेंद्रसिंहराजेंवरही अन्याय झाला तरी मी खपवून घेणार नाही,’ अशी भूमिका खासदार उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केली.

साताऱ्यातील दारू दुकान काढण्यावरून वादावादी झाली होती. या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.खासदार उदयनराजे म्हणाले, ‘मी जे करतोय ते कर्तव्य म्हणून करत आहे. कारण लोकांवर झालेला अन्याय मला सहन होत नाही. येथे लोकशाही असून, मी तत्त्वांशी बांधील आहे. शिवेंद्रसिंहराजेंवरील अन्यायही मी खपवून घेणार नाही. तरीही प्रत्येकाने विचार करणे महत्त्वाचे आहे. पैशाच्या जोरावर दारूचं दुकान सुरू आहे. तेथे जवळच असणाºया मंडईला महिला येतात. तेथील एक दारू दुकान बंद होण्याने अनेकांचे कल्याण होत असेल तर काय चुकीचं काम करत आहे.’

मला अपेक्षा होती की आमदार या नात्याने माझे धाकटे बंधूराज शिवेंद्रसिंहराजे यांनी त्यांच्या जवळच्या मित्रांना सांगायला पाहिजे होते. यामध्ये मला दोषी पकडत असाल तर मी खऱ्या अर्थाने माझा दोष स्वीकारतो; पण मी अन्याय सहन करणार नाही, असेही उदयनराजेंनी स्पष्ट केले. तसेच प्रसारमाध्यमांनी अन्यायाच्या विरोधात भूमिका घ्यावी, असे आवाहनही यावेळी उदयनराजे भोसले यांनी यावेळी केले.परत मीच आहे, हे लक्षात ठेवामी निवांत घरी बसून राहू शकतो, एसी गाडीत फिरू शकतो. मात्र अन्याय माझ्या मनात रुततो. अन्याय झाला तर वाटेल त्या परिस्थितीत सहन करणार नाही. पक्ष कुठलाही असू दे, मला अन्याय सहन होत नाही. मात्र तुमच्यावर वेळ येईल, तेव्हा मीच तुमच्या पाठीशी असणार आहे. तुमचा भाऊ म्हणून...आई-वडिलांचा मुलगा म्हणून मीच असणार आहे, एवढं लक्षात ठेवा, असे उदयनराजेंनी स्पष्ट केले. 

दारूमुळं कुटुंबं उद्ध्वस्त होतात : उदयनराजेजागा नसताना पैशांच्या जोरावरती दारूचं दुकान चालू ठेवलंय. माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका, जाऊन बघा. या ठिकाणी मंडईला महिला येतात. दारूच्या व्यसनामुळं कुटुंबं उद्ध्वस्त होतात. एवढी काय मोगलाई लागलीय हो, एखादं दारूचं दुकान निघाल्याने कल्याण होत असेल तर काय चुकीचं आहे. ‘फॅक्ट इज फॅक्ट’ दारूचं दुकान बंदच झालं पाहिजे, असेही उदयनराजेंनी स्पष्ट केले.

 

खासदारांनी माझ्या अन्यायाबाबत काळजी करू नये : शिवेंद्रसिंहराजेसातारा : ‘देशी दारू दुकान बंद करण्याचा मुद्दा नसून खासदार उदयनराजे हे सुपारी घेऊनच जागा खाली करण्यासाठी आले होते,’ असा दावा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला. तसेच त्यांनी माझ्यावरील अन्यायाची काळजी करू नये, अन्याय झाला तर मी कधीही शांत बसत नाही, हेही खासदारांनी लक्षात ठेवावे, अशी कोपरखळीही शिवेंद्रसिंहराजेंनी मारली.

साताऱ्यातील देशी दारू दुकानाबद्दल झालेल्या वादानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी ‘शिवेंद्रसिंहराजेंवरही अन्याय झाला तर मी खपवून घेणार नाही,’ असे वक्तव्य केले होते. त्याला प्रसारमाध्यमांशी बोलताना आ. शिवेंद्रसिंहराजेंनी प्रत्युत्तर दिले.

आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘साताºयातील देशी दारू दुकान बंद करायचा विषय नव्हता. तर तेथील जागा खाली करण्याचा होता. त्यांचा हा नियोजित प्लॅन होता. देशी दारू दुकाने बंद करायची असतील तर त्यांनी आपल्या मतदारसंघातील सर्व दारू दुकाने बंद करावीत. तसेच पोलीस व आम्ही तेथे आल्यानेच त्यांचा हा डाव यशस्वी झाला नाही. मतदारसंघात अनेक प्रश्न आहेत. दुष्काळ पडला आहे, त्याकडेही खासदारांनी लक्ष दिले तर बरं होईल.’त्यांना जागा खाली करायची होती. या ठिकाणी पेढ्याचे दुकान असते तर खासदारांनी तेही खाली करण्याची भूमिका घेतली असती, असेही आ. शिवेंद्रसिंहराजेंनी स्पष्ट केले.

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेSatara areaसातारा परिसर