शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! तुफान गर्दी, प्रचंड उत्साह, वरळी डोममध्ये काय घडतंय?
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
4
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
5
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
6
"मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
7
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
8
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
9
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला भक्तिरंगात न्हाऊन निघा; प्रियजनांना पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश!
10
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
11
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
12
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
13
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
14
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
15
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
16
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
17
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
18
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
19
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
20
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!

‘यू-टर्न’ रेल्वेमागावरील प्रवास पाडतोय भुरळ

By admin | Updated: April 2, 2015 00:37 IST

पर्यावरणप्रेमींची मागणी : आदर्की येथील ‘अर्धचंद्राकृती’ रेल्वेमार्गालगत शोभेची झाडे लावल्यास सौंदर्य वाढेल

सूर्यकांत निंबाळकर - आदर्की मिरज-पुणे लोहमार्गावर वाठार स्टेशन-आदर्की रेल्वेस्थानकादरम्यान सोळकीचे टेक येथे रेल्वे गाड्या पूर्णपणे ‘यू-टर्न’ घेतात. हे दृश्य अत्यंत नयनरम्य दिसते. याठिकाणी शासनाने वेगवेगळ्या झाडांची लागवड केल्यास हे ठिकाण एक पर्यटनस्थळ म्हणून उदयाला येईल. शासनस्तरावर यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमींमधून होत आहे.मिरज-पुणे लोहमार्गावर मीटरगेज रेल्वेलाईन सुरळीत चालू ठेवून ब्रॉड गेज रेल्वेलाईनचे काम करताना जुन्या लाईनशेजारून आदर्की खुर्द गावच्या हद्दीत वाठार स्टेशन-आदर्की रेल्वेस्थानकादरम्यान सोळकीचे टोक येथे पुण्यापासून ११० ते १११ किलोमीटर दरम्यान इंग्रजी वर्णाक्षर ‘सी’प्रमाणे वळण असून याठिकाणी रेल्वेगाडी अर्धगोलाकारात वळण घेते. या वळणावर गाडी आल्यानंतर पुढच्या डब्यातील प्रवासी मागील डब्यातील प्रवाशांना पाहू शकतात. हे दृश्य फक्त आदर्की खुर्द येथेच पाहायला मिळते. हा परिसर डोंगराळ असून रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ओसाड झाला आहे. या परिसरात रेल्वे प्रशासनाची मोठी मोकळी जागा आहे. याठिकाणी वृक्षलागवड करून खंडाळ्याच्या घाटातील मल्कीहिल रेल्वेस्थानकाप्रमाणे विकास केल्यास प्रवाशांची संख्या वाढू शकते. मिरज-पुणे लोहमार्गाचे दुहेरीकरण होणार आहे. त्यावेळी ‘यू-टर्न’जवळून दुसऱ्या रेल्वेलाईनचे काम करताना मोकळ्या जागेत वृक्षारोपण करण्याची गरज आहे. दुर्लक्षित रेल्वेस्थानक बंद करून बिचुकले वस्ती येथे झाल्यास प्रवाशांची सोय होईल आणि मालवाहतूकही वाढेल. ...तर वेगळी ओळख मिळेलमहाराष्ट्रातील रेल्वेलाईनच्या जाळ्यात आदर्कीसारखा ‘यू-टर्न’ कोठेही नाही. पन्नास वर्षांपूर्वी शंकर नारायण कंपनीने लाखो ब्रास माती, मुरुम, दगड टाकून शंभर फूट उंचीचा भराव तयार केला आणि त्यावन रेल्वेमार्ग काढला आहे. या भरावावर त्यावेळपासून वेडीबाभळ, घायपाताचे साम्राज्य पसरले आहे. दोन किलोमीटर अंतराच्या या मार्गावर फळाफुलांची झाडे लावल्यास प्रवाशांचा ओढा वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.