शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
5
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
6
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
7
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
8
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
9
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
10
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
11
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
12
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
13
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
14
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
15
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
16
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
17
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
18
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
19
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
20
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

जिल्ह्यात अपघातात दोन तरुणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:24 IST

सातारा : जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला. हे दोन्ही अपघात सातारा तालुका हद्दीत झाले आहेत. ...

सातारा : जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला. हे दोन्ही अपघात सातारा तालुका हद्दीत झाले आहेत. मेढा - सातारा रस्त्यावर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात खेड येथील तरुणाचा साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सुशांत प्रकाश कांबळे (वय ३५, रा. खेड) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत सातारा तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चार दिवसांपूर्वी सुशांत कांबळे हा दुचाकीवरून मेढ्याहून साताऱ्याकडे येत होता. यावेळी चिंचणी (ता. सातारा) गावच्या हद्दीत त्याची दुचाकी अचानक घसरली. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती. त्याला तत्काळ साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, मंगळवारी दुपारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, दुसरा अपघात सातारा तालुक्यातील काशीळ गावच्या हद्दीत झाला. समोर चाललेल्या ट्रकला दुचाकीस्वाराने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील गौरव लोहार (वय २८, रा. काशीळ) हा तरुण गंभीर जखमी झाला होता. जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मंगळवारी सायंकाळी मृत्यू झाला. या अपघाताची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात झाली आहे.