शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

दोन वर्षांतच शाहूपुरीत सौरदिव्यांचा ‘उजेड’

By admin | Updated: August 26, 2015 21:27 IST

पथदिवे खांबासहित चोरीस : ग्रामपंचायत हतबल ; बॅटऱ्यांसह सुट्या भागांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याने रस्ते अंधारलेले

संतोष कणसे - शाहूपुरी --येथील ग्रामपंचायतीमार्फत बसविण्यात आलेले सर्व सौरदिवे बंद स्थितीत आहेत. सौरदिव्यांचा मोठा फटका ग्रामपंचायतीला बसत असून, अनेक सौरदिव्यांच्या साहित्यासह बॅटऱ्या चोरीस गेल्याने शाहूपुरी ग्रामपंचायत अक्षरश: हतबल झाली आहे. ग्रामपंचायत फंड व कृषी खात्याकडून अनुदान या योजनेअंतर्गत शाहूपुरी ग्रामपंचायतमार्फत २००६ मध्ये १६१ सौरदिवे बसविण्यात आले होते. या परिसरातील सार्वजनिक ठिकाणी सौरदिवे बसविण्याची योजना अत्यंत उपयोगाची होती. येथे गरजेनुसार सौरदिवे देण्यात आले होते. हे दिवे बसविण्याचे काम फत्ते झाले असले तरी काही दिवसांतच या दिव्यांच्या बॅटऱ्या व बल्ब चोरून नेणारी टोळी कार्यरत झाली. बघता-बघता अनेक दिव्यांचे साहित्य चोरीस गेले.ग्रामपंचायतीच्या हद्दीत बसविण्यात आलेले दिवे बंद आहेत, हे प्रकार दिसायला किरकोळ दिसत असले तरी यामध्ये लाखोंचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. एका संचासाठी साधारण २७,५०० इतका खर्च येतो. एकूण अंदाजे चाळीस ते पंचेचाळीस लाख खर्च झाला असल्याचे समजते. हा सर्व तोटा ग्रामपंचायतीला सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायत स्थापनेनंतर सन २००६ साली सौर पथ दिवे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याअनुशंगाने २००८ पर्यंत तीन टप्प्यात े ५८ लाख खर्चून १६१ सौरपथदिवे खरेदी करुन शाहूपुरीच्या विविध भागात बसविण्यात आले. या उपक्रमाआंतर्गत महाराष्ट्र शासनाकडून ग्रामपंचायतीला ५ लाख ५० हजार एवढी एबसिडी देण्यात आली होती.खरेदी करतेवेळी संबंधीत कंपनीने गॅरंन्टीच्या कालावधीत विक्री पश्चात देखभाल दुरूस्ती केली. परंतु त्या दरम्यान सौर दिव्याच्या बॅटऱ्या व पॅनल चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले. तसेच वेळच्या वेळी देखभाल दुरूस्तीसाठी सेवा उपलब्ध होवू शकली नाही. शाहूपुरी ग्रामपंचायत हद्दीत सातत्याने वाढणाऱ्या नागरीकरणामुळे सार्वजनिक दिवाबत्तीचा प्रश्न प्रकर्षाने समोर येत होता. २००९ ला ग्रामपंचायतीने पाहणी केली असता सुमारे १५०० पथदिव्यांची आवश्यकता दिसून आली. म्हणून सर्व प्रथम ग्रामपंचायत हद्दीमधील सहकारी गृहनिर्माण संस्थाचे पथदिवे ग्रामपंचायतीकडे वर्ग करुन घेतले व जिल्हा परिषद सातारा यांच्या परवानगीने वाढीव पथ दिव्यांचा प्रस्ताव मंजूर करुन घेतला. २०१२ ला ग्रामपंचायतीने शासनाकडे पाठपुरावा करुन वीजबिल शासनामार्फत भरण्याच्या योजनेत शाहूपुरी ग्रामपंचायतीचा समावेश करून घेतला व २०१२ पर्यंत भरलेल्या वीज बीलांची रक्कम परत मिळावी यासाठी संबंधत कार्यालयाकडे मागणी करण्यात आली आहे. सौरदिवे खांब चोरीस जाऊ नयेत म्हणून लवकरच पंचायत समिती बीडीओ यांच्याबरोबर चर्चा करून पथदिवे खांब हटविण्याचे काम सुरू करण्यात येईल. तसेच खांबाचा लिलाव करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील, असे ग्रामविकास अधिकारी एम. व्ही. कोळी यांनी सांगितले.-संतोष कणसेदिव्यांचे झाले काय ?शाहूपुरी परिसरामध्ये सौर पथदिवे बसविण्यात आले होते; मात्र सध्या अनेक सौरदिवे बंद आहेत. काही पथदिवे खांबासहित चोरीस गेलेले आहेत. याठिकाणी सौरदिवे उपयोगी ठरत होते. त्यामुळे या सौरदिव्यांचा फायदा खूप महत्त्वाचा होता. मात्र, देखभाल नसल्यामुळे जवळपास सर्वच पथदिवे बंद आहेत. नवीन बॅटरी टाकायची झाली तरी तीन ते चार हजार रुपये इतका खर्च येतो. याठिकाणी सौरदिव्यांची काय परिस्थिती आहे. याची चौकशी संबंधिताकडून झाली पाहिजे. अशी मागणी नगारिकांमधून होत आहे.