शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

खंबाटकीत ट्रक उलटून दोन ठार

By admin | Updated: December 31, 2014 00:21 IST

पुन्हा ‘एस’ वळण : क्रेनच्या सहायाने चक्काचूर वाहन उचलून मृतदेह काढले बाहेर

खंडाळा : सातारा-पुणे महामार्गावर खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर बेगरुटवाडीजवळ ट्रक उलटून झालेल्या अपघातात दोनजण जागीच ठार झाले. अत्यंत घातक, अशास्त्रीय अशा ‘एस’ वळणावरच आणखी दोघांना जीव गमवावा लागल्याने या वळणावर मरण स्वस्त झाल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.याबाबत खंडाळा पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, आज, मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मालट्रक (केए २२ बी १२१५) हा साताऱ्याकडून पुण्याकडे जात असताना धोकादायक ‘एस’ आकाराच्या वळणावर चालकाचा ताबा सुटून उलटला. तीव्र उतारावरून भरधाव वेगाने आलेला ट्रक उलटल्याने त्याचा चक्काचूर झाला. या अपघातात ट्रकचालक इस्माइल मोहंमदहनीफ तटगर (वय ५३) व क्लीनर सतीश रघुनाथ जोशी (रा. यमकनमर्डी, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) हे दोघे जागीच ठार झाले. बेळगावहून कार्डशीट आणि कागद घेऊन हा ट्रक मुंबईला निघाला होता. अपघातानंतर परिसरात कागदांचे गठ्ठे रस्त्यावर आणि दरीत इतस्तत: विखुरले होते. अपघाताची माहिती मिळताच खंडाळा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक शेळके यांच्यासह कर्मचाऱ्यांनी अपघातस्थळी धाव घेतली. क्रेनच्या साह्याने ट्रक उचलून मृतदेह बाहेर काढण्यात आले. अपघातामुळे लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. प्रभाकर भानुदास सोनवणे यांनी अपघाताची खबर दिली. (प्रतिनिधी)