शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पाथरपुंजसह अन्य दोन गावं लवकरच सांगली जिल्ह्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:19 IST

सातारा : देशात सर्वाधिक पावसाची नोंद झालेले सातारा जिल्ह्यातील पाथरपुंजसह मळे आणि कोळणे ही गावं लवकरच सांगली जिल्ह्यात पुनर्वसित ...

सातारा : देशात सर्वाधिक पावसाची नोंद झालेले सातारा जिल्ह्यातील पाथरपुंजसह मळे आणि कोळणे ही गावं लवकरच सांगली जिल्ह्यात पुनर्वसित होणार असल्याची माहिती आहे. सातारा जिल्ह्यात गावठाण जागा उपलब्ध होत नसल्याने सांगली जिल्ह्यातील जागेची पाहणी केल्याची माहिती शासकीय सूत्रांनी दिली आहे.याबाबत माहिती अशी, कोयनानगरच्या नैऋत्येला असलेले पाथरपुंज हे गाव सातारा, सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमारेषेवर आहे. पाथरपुंजसह मळे आणि कोळणे या तिन्ही गावांमध्ये मिळून ३५० कुटुंबांचे वास्तव्य आहे. यंदा जून ते आॅगस्टदरम्यान ७ हजार ३५९ मिलिमीटर पाऊस झाला. या पावसामुळे येथील बहुतांश घरं कोसळली तर काही घरं पडण्याच्या स्थितीत अद्यापही तग धरून आहेत. महापुराचा आढावा घेण्यासाठी मुंबई पालिकेचे आयुक्त डॉ. प्रवीणसिंह परदेशी यांची सांगली-कोल्हापूर पूरपुनर्वसन विशेष समिती समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पाथरपुंज, मळे आणि कोळणे ही तिन्ही गावं चांदोलीच्या गाभा क्षेत्रात वसलेली आहेत. पूरपरिस्थिीतीत या गावांना भेटी दिल्यानंतर परदेशी यांनी या गावांचे पुनर्वसन होण्यासाठी तातडीने हालचाली करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार सातारा, सांगली आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये जागेचा शोध सुरू झाला. सातारा आणि रत्नागिरीमध्ये वनक्षेत्र असल्याने तेथे या गावांचे पुनर्वसन होणे तांत्रिकदृष्ट्या वेळ खाणारे ठरू शकते.सांगली जिल्ह्यातील चांदोली अभयारण्यातील गाभा क्षेत्रात पाथरपुंज, मळे आणि कोळणे ही तीन गावं आहेत. येथील स्थानिकांच्या मागणीनुसार त्यांचे पुनर्वसन व्हावे, अशा सूचना केल्या आहेत. त्यानुसार पाथरपुंजसाठी सांगली जिल्ह्यातील काही गावांची पाहणीही झाली आहे. पुढच्या वर्षी ही गावं गाभा क्षेत्रातून पुनर्वसित गावात वसवली जातील, असे निर्धारित केले आहे.- डॉ. प्रवीणसिंह परदेशी,समन्यवयक, सांगली-कोल्हापूर पूरपुनर्वसन विशेष समिती