शहरं
Join us  
Trending Stories
1
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
2
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
3
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
5
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
6
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
7
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
8
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
9
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
10
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
11
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
12
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
13
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
14
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
15
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
16
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
17
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
18
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
19
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
20
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)

corona virus-साताऱ्यात कोरोनाचे आणखी दोन संशयित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 15:03 IST

सातारा जिल्ह्यात कोरोनाचे संशयित असलेले दोन रुग्ण बुधवारी दुपारी आढळले असून, त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या स्वॅपचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

ठळक मुद्देसाताऱ्यात कोरोनाचे आणखी दोन संशयित

सातारा : जिल्ह्यात कोरोनाचे संशयित असलेले दोन रुग्ण बुधवारी दुपारी आढळले असून, त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या स्वॅपचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.संबंधित दोन युवक वीस ते पंचवीस वयोगटातील आहेत. एक दुबई तर दुसरा सौदी अरेबिया येथून सातारा जिल्ह्यात आला आहे. गत सहा दिवसांपूर्वी हे दोघे आपापल्या घरी आले. त्यावेळी त्यांना कसल्याही प्रकारचा त्रास जाणवला नाही.

मात्र, बुधवारी दुपारी त्यांना अचानक खोकला, ताप, सर्दीचा त्रास होऊ लागल्यानंतर त्यांनी जिल्हा रुग्णालयातील प्रशासनाशी संपर्क साधला. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने त्यांना सिव्हिलमध्ये तत्काळ येण्याचा सल्ला दिला. त्यानंतर हे दोघेही युवक जिल्हा शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये दाखल झाले.

त्यांच्या घशाचे नमुने पुणे येथील एन.आय. व्ही. कडे पाठविण्यात आले आहेत. अद्याप या दोघांचा अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला नसून, अहवाल आल्यानंतर त्यांना कोरोनाची बाधा झाली आहे की नाही, हे समजणार आहे.दरम्यान, यापूवी दाखल झालेल्या दोघा संशयितांचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना दुसऱ्या दिवशी रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. त्यामध्ये एक तीस वर्षीय युवक आणि सहा वर्षाच्या बालिकेचा समावेश होता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर