लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनामुळे आणखी दोघांचा मृत्यू झाला. यामुळे बळींची संख्या १ हजार ८१४ वर पोहाेचली आहे. तसेच नवे ८२ रुग्ण आढळून आले. यामुळे बाधितांचा आकडा ५६ हजार ३७१ इतका झाला आहे.
जिल्ह्यात गत आठवड्यापासून कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असून, गुरुवारी रात्री ९० रुग्ण आढळून आले. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये मोरवे, ता. खंडाळा येथील ८० वर्षीय पुरुष आणि म्हसवे, ता. जावळी येथील ८३ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
दरम्यान, शुक्रवारी दिवसभरात ५९ जण तर आतापर्यंत ५३ हजार ७४९ जण कोरोनातून मुक्त झाले आहेत. तसेच शुक्रवारी दिवसभरात ३६० जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. गत काही दिवसांपासून तपासणीसाठी रुग्णालयात गर्दी वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे.