शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दोन मिनिटांचे अंतर.. २५ किलोमीटरचा प्रवास

By admin | Updated: September 26, 2016 00:08 IST

वडूथ-आरळे पूल : ग्रामस्थांना करावी लागते पायपीट; वेळेसह आर्थिक नुकसान; वाहनधारकांना प्रतीक्षा काम पूर्ण होण्याची

शिवथर : वडूथ-आरळे येथील कृष्णा नदीवरील पुलाला भगदाड पडल्याने वडूथ गावाचा आरळे गावाबरोबर संपर्क तुटला आहे. गाव दिसतंय; पण चारचाकी घेऊन जाता येईना. अगदी आरळे आणि वडूथ गावाच्या मध्यातून कृष्णानदी वाहत आहे. चारचाकी घेऊन जायचं म्हटलं तर अवघ्या दोनच मिनिटांमध्ये जाता येत होतं; परंतु कृष्णा नदीवरील पुलाला भगदाड पडल्याने दोन मिनिटांच्या अंतरावर असलेल्या गावात अत्यावश्यक असेल तर कमीत कमी पंचवीस किलोमीटरचा प्रवास करावा लागतोय. यामुळे वाहनचालक आणि ग्रामस्थ पुलाकडे टक लावून बसले आहेत. पुलाचे काम चालू कधी होणार आणि संपणार कधी, असे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे. वडूथ- आरळे येथील कृष्णा नदीवरील पुलावरून शाळेसाठी मुलं बसाप्पाचीवाडी, पाटखळ माथा, वाढे येथून येत असतात; परंतु या मुलांना वडूथच्या अलीकडे एक किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. या पुलावरून वाहन जात नसल्याने मोठी चालण्याची कसरत करावी लागत आहे. गाव दिसतंय; पण चारचाकी घेऊन जाता येईना. नदीच्या अलीकडून पलीकडे फक्त बघायची भूमिका चारचाकी वाहनचालक करत आहेत. जायचं म्हटलं तर पंचवीस किलोमीटरचे अंतर म्हणजे सातारापर्यंत येथून माहुली, सोनगाव, बोखरळ, वडूथ असा प्रवास चारचाकी वाहनाकरिता करावा लागत आहे. साताऱ्याकडे जाण्यासाठी फलटणवरून येणाऱ्या वाहनांची फसगत होत आहे. वडूथ येथे गाडी आल्यावर वाहनचालकांना अवघा वडूथपासून सातारा आठ किलोमीटर आहे. परंतु त्यासाठी देखील पंचवीस किलोमीटरचे अंतर तोडावे लागत आहे. आठ दिवसांमध्येच वाहनचालक व ग्रामस्थ या पडलेल्या पुलाला वैतागले आहेत. कृष्णानदीवर पडलेल्या भगदाडामुळे वाहनचालक व ग्रामस्थांमधून बोललं जातंय की, आम्ही काही दिवस त्रास सहन करू; परंतु कामच चालू नाही तर संपणार कधी, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर) काम चांगल्या प्रकारे व्हावे पुलाला भगदाड पडल्याने या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. पुलाचे काम सुरू आहे. आमचा जीव आम्हाला प्यारा आहे. पुलाचं काम चांगल्या स्वरुपाचं व्हावं आता आम्ही त्रास सहन करत आहे. परंतु या पुलाचं काम त्वरित मार्गी लागावं, अशी आमची भूमिका आहे. - राहुल कदम, वडाप व्यावसायिक, आरळे