शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘भादे’नंतर आता दोन बिबट्यांचा मुक्काम ‘वाठार’मध्ये!

By admin | Updated: July 23, 2016 00:52 IST

ग्रामस्थ घरातच : पिंजरा लावण्यासाठी वन कर्मचाऱ्यांचे लक्ष विदर्भाकडे--भीतीपोटी लाख मोलाचा भाजीपाला जागेवर पडून...

खंडाळा : खंडाळा तालुक्यातील अंदोरी परिसरात वावरणाऱ्या बिबट्याच्या दहशतीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या सहा दिवसांपासून संपूर्ण पंचक्रोशीत केवळ बिबट्याच्याच चर्चा होत आहेत. भीतीपोटी शेतकरी वर्ग घराबाहेर पडायला धजावत नाही. त्यामुळे शेतीची कामे खोळंबली आहेत. भाजीपाला जागेवरच आहे. त्यामुळे एरव्ही काळ्या आईच्या सेवेत रमणारा शेतकरी आता रानाकडे डोळे लावून बसला आहे. दरम्यान, वनविभागाने कसून शोध सुरू केला असला तरी बिबट्याच्या पायाच्या ठशांव्यतिरिक्त त्यांच्या हाती काही लागले नाही. खंडाळा तालुका हा तसा दुष्काळी पट्ट्याचा भाग. इथं पाळीव जनावरांपलीकडे कधीच कुठल्या प्राण्यांशी संबंध आला नाही; मात्र नीरा नदीच्या उजव्या कुशीत असणाऱ्या अंदोरी गावातील रुई शिवारात रविवारी सायंकाळी अचानक बिबट्याचे दर्शन झाले आणि सर्वत्र एकच खळबळ उडाली. त्यातच त्याने कुत्र्यांवर हल्ला करून फडशा पाडला तर माणसांवरही हल्ला केला. त्यामुळे लोकांमध्ये बिबट्याची चांगलीच दशहत पसरली.बिबट्याचा वनविभागाकडून कसून शोध सुरू असला तरी त्याच्या पायाच्या ठशांव्यतिरिक्त काहीच हाती लागले नसल्याने तो कुठे असेल याची धास्ती लोकांमध्ये आहे. रोज नित्यनियमाने रानात जाणाऱ्या लोकांनी घरीच राहणे पसंत केले आहे. साहजिकच शिवारात माणसांचा कुठेही बोलबाला नाही.त्यातच अंदोरीसह भादे-वाठार परिसरातही दोन बिबट्यांचा वावर असल्याचे दिसून आल्याने या गावांमध्ये खळबळ उडाली आहे. रानात कुठे नजरेला पडला तर लगेचच त्याचा गावभर गोंगाट होतोय. त्यामुळे बाहेर पडणे जिकिरीचे बनत आहे.अंदोरीच्या शिवारात सध्या उसाचे मोठे पीक आहे. त्यातच अनेक ठिकाणी उसाची लागवड सुरू आहे. मात्र, काढलेल्या सरीमध्ये टाकलेली उसाची बेणं तसेच ठेवून मजूर घरीच आहे. सध्या बाजारामध्ये टोमॅटो, भेंडी या पिकांना चांगला दर आहे. मात्र, शेतामध्ये पिकलेली टोमॅटो किंवा तोडणीला आलेली भेंडी काढण्यासाठी कुणीही फिरकेना झालेत. लाख मोलाचा माल शिवारात पडून आहे. तसेच उसाच्या मोठ्या पिकाला पाणी देण्यासाठीही जायला शेतकरी तयार होत नाही. शेतकऱ्यांजवळ असणारी दुभती जनावरंही रानात चरायला घेऊन जाणे मुश्किल झाले आहे. रानात ओला चारा, हिरवेगार गवत असतानाही गाय, बैल यांना घरीच गोठ्यात बांधून ठेवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. उसाची लागवड असो, वा पिकांची खुरपणी. शेतमजूर शेतात जायला तयार होत नाहीत. त्यामुळे शेतकरीराजाही अडचणीत आलाय. या बिबट्याचं करायचं काय? असा प्रश्न सर्वांपुढेच पडला आहे. खंडाळा तालुक्यातील अंदोरी परिसरात वनविभागाचे कर्मचारी बिबट्याचा शोध सर्वत्र घेत आहेत.