शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अदालत वाड्यासमोर दोन राजेंची सायकलस्वारी--जागतिक बंधूदिन...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 22:52 IST

शालेय जीवनात एक भाऊ दुसऱ्याला मदत करत असतो. भावावर आलेले संकट टाळण्यासाठी सिद्ध असलेले अनेक भाऊ आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात. खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोन बंधूंमध्ये

ठळक मुद्देआठवण; शिवेंद्रराजेंचा अभ्यास पूर्ण केला म्हणून उदयनराजेंना ओरडा

सागर गुजर ।साातारा : शालेय जीवनात एक भाऊ दुसऱ्याला मदत करत असतो. भावावर आलेले संकट टाळण्यासाठी सिद्ध असलेले अनेक भाऊ आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात. खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोन बंधूंमध्येही लहानपणी असेच सख्ख्य होते.

शिवेंद्रसिंहराजेंचा अभ्यास पूर्ण केला म्हणून खुद्द उदयनराजेंनाच आपल्या काकींचा ओरडा खावा लागला होता. आमदार शिवेंद्रसिंहराजेंनीच ही आठवण ‘ब्रदर्स डे’च्या निमित्ताने ‘लोकमत’शी शेअर केली.

खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोन बंधूंमधील विलोभनीय नात्याबद्दल सातारकरांना कायमच उत्सुकता असते. राजकारणाच्या सारिपाटामुळे दोघांत कायमच युद्धजन्य परिस्थिती पाहायला मिळत असली तरी सातारकरांच्या मनात मात्र या भावांबद्दल कायमच आदर असतो.

ऐतिहासिक अदालवाड्यात मोठे बंधू उदयनराजेंसोबत केलेली धम्माल शिवेंद्रसिंहराजेंच्या अजूनही स्मरणात आहे. शिवेंद्रसिंहराजेंनी ‘लोकमत’च्या वर्धापनदिनानिमित्त कार्यालयात येऊन शुभेच्छा दिल्या. गप्पांच्या ओघात लहानपणीच्या आठवणींविषयी छेडले असता विलोभसपणे त्यांनी आपल्या आठवणी मांडल्या.

‘आम्ही पूर्वी अदालतवाड्यात राहायला होतो. मी साताºयातच शिकायला होतो. तेव्हा उदयनराजे पाचगणीत शिकत होते. माझं मराठी थोडं कच्च होतं, एकदा उदयनराजेंनीच माझा मराठीचा अभ्यास पूर्ण केला.

हा प्रकार आईसाहेबांच्या लक्षात आला. अक्षरातील बदल त्यांनी लगेच ताडला आणि ‘शिवेंद्रला अभ्यासात मदत करायची नाही,’ असे त्यांनी उदयनराजेंना सुनावले होते. उदयनराजेंचे कुटुंब जरी जलमंदिरमध्ये राहायला असले तरीही उन्हाळा व दिवाळीच्या सुटीत आम्ही सर्वजण अदालतवाड्यातच एकत्र येत असू. वाड्यात लाकडी तलवारी होत्या. या तलवारांनीच आम्ही सारे बच्चेकंपनी खेळायचो. क्रिकेट, पोहणे,विटीदांडू, सायकल चालवणे अशा खेळांमध्ये आम्ही धम्माल उडवून द्यायचो. पागेतील मुलेही आमच्यासोबत खेळायला असायची. दिवाळीत एकत्र येऊन किल्ला बनवायचा.

वाड्याच्या वरच्या बाजूला राहणाºया कुंभारवाड्यातून मातीचे सैन्य आणून ती किल्ल्यावर मांडायचो. तेव्हा पुण्यशील सुमित्राराजे भोसले (दोघांच्याही आज्जी) होत्या. त्यांना मुले एकत्र येत असल्याने खूप आनंद व्हायचा. त्या काळी सुट्यांमध्ये आजींकडून खूप काही शिकायला मिळायचं.’याकूबचे सायकल दुकानअदालतवाड्याच्या खालच्या बाजूला याकूबचं सायकल दुकान होतं. तिथं आठ आणे, रुपया दिला की भाडेतत्त्वावर सायकल मिळायची. अर्धा तास, तासभर ही सायकल चालवायला मिळायची. उदयनराजे-शिवेंद्रसिंहराजे आपल्या मित्रांसोबत अदालतवाड्याच्या समोरच्या रस्त्यांवर सुसाटपणे या सायकली दामटत असत.