शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

Satara: गव्याच्या हल्ल्यात दोघे जखमी, महाबळेश्वरनजीकची घटना

By दीपक शिंदे | Updated: December 28, 2023 19:26 IST

महाबळेश्वरच्या जंगलात गव्याचे प्रमाण वाढले

महाबळेश्वर : महाबळेश्वर शहरापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेले मांघर या ठिकाणी गव्याच्या केलेल्या हल्ल्यात दोनजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर साताऱ्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना गुरुवार, दि. २८ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. पोलिस पाटील योगेश गणपत पार्टे, गंगाराम पार्टे असे जखमींचे आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, महाबळेश्वरहून तापोळा एसटीमधून आलेले दोघेजण गुरुवारी सायंकाळी मांघर बस थांब्यावर उतरून पायी मांघर गावाकडे निघाले होते. ते काही अंतर चालून गेल्यावर एक गवा रस्ता ओलांडून जात होता. जंगलातून येऊन अचानक गव्याने मांघरचे पोलिस पाटील योगेश गणपत पार्टे (वय ३९) व गंगाराम पार्टे (४८, दोघे रा. मांघर) याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात वाटसरू गंगाराम पार्टे पळून जाण्यास यशस्वी झाले. परंतु मांघरचे पोलिस पाटील एका पायाने अपंग असल्याने त्यांना पळता आले नाही. त्यामुळे ते अधिक जखमी झाले. 

यावेळी मांघर गावातील स्थानिक नागरिकांनी योगेश पार्टे यांना प्रथम उपचारासाठी महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे हाताला व बरगडीला दुखापत झालेली दिसून आली. अधिक उपचारासाठी सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. महाबळेश्वरच्या जंगलात गव्याचे प्रमाण जास्त वाढले असून यामध्ये गव्याचे हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. गव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान