शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात आरपीआयच्या दोन गटात राडा, आंबेडकर जयंती निमित्त लावणी कार्यक्रम घेतल्याचा निषेध

By दीपक शिंदे | Updated: April 25, 2023 16:44 IST

वादामुळे तणावाचे वातावरण

सातारा : साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहात मंगळवारी दुपारी रिपाइच्या दोन गटात जोरदार हमरी तूमरी झाली. अंगावर धावून जाण्याचाही प्रकार घडला. मात्र, वेळीच यामध्ये मध्यस्थी झाल्याने हा वाद मिटला. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लावणीचा कार्यक्रम झाल्यावरून हा वाद झाल्याचे सांगण्यात आले. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, साताऱ्यातील शासकीय विश्रामगृह येथे रिपाइच्या दोन गटांमध्ये वाद झाला. गवई गटाचे जिल्हाध्यक्ष संजय गाडे आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदीप शिंदे यांच्यात शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार प्रसारमाध्यमांच्या समोर घडून आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या भीम फेस्टिवलमध्ये लावणीचा कार्यक्रम झाल्याने हा वाद वाढला होता. त्यातूनच संजय गाडे आणि संदीप शिंदे यांच्यात जोरदार वाद झाला.यावेळी तेथे रिपाइ आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, अण्णा वायदंडे हे ही होते. या वादावेळी एकमेकावर अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. तसेच जोरदार बाचाबाची झाली. या वादामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बराचवेळ हा प्रकार सुरू होता. मात्र, या दरम्यान रिपाईतील काहीजणांनी वादावर पडदा टाकला. रिपाइं (ए) गटाचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ तसेच अण्णा वायदंडे यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. तसेच दरवर्षी भीम फेस्टिवल हा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी संजय गाडे आणि संदीप शिंदे हेही तेथे उपस्थित होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर