शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : जाळगेवाडी ग्रामपंचायतीतील दोन सदस्यांची निवड अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2021 17:23 IST

राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या जाळगेवाडी ग्रामपंचायतीवर गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई गटाची एकहाती सत्ता आहे. निवडणुकी दरम्यान थेट सरपंचपदी शिवाजी काटे व सात सदस्य निवडून आले होते.

चाफळ : जाळगेवाडी ता. पाटण ग्रामपंचायतीच्या दोन विद्यमान सदस्यांची निवड अपात्र ठरविण्यात आली आहे. वेळेत जात पडताळणी कागदपत्रे सादर न केल्याची तक्रार रविंद्र दामोदर गुरव यांनी केल्यानंतर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी ही कारवाई केली. या अपात्रतेच्या कारवाईमुळे जाळगेवाडीसह संपूर्ण चाफळ विभागातील राजकीय वातावरण पुरते ढवळून निघाले आहे.राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या जाळगेवाडी ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक २०१७ मध्ये झाली होती. या ग्रामपंचायतीवर गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई गटाची एकहाती सत्ता आहे. निवडणुकी दरम्यान थेट सरपंचपदी शिवाजी काटे व सात सदस्य निवडून आले होते. यात, मागास प्रवर्गातुन प्रभाग तीन मधून बाळाराम तात्याबा सुतार व महिलांच्या मागास प्रवर्गातून प्रभाग दोन मधून उषाताई तानाजी सुतार या निवडून आल्या होत्या. निवडून आल्यानंतर या दोन सदस्यांनी वेळेत जात पडताळणी प्रमाणपत्र प्रशासनाला सादर न केल्याने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे.

या ग्रामपंचायतीत सरपंच काटे यांच्यासह सर्व सदस्य हे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई गटाचे आहेत. या ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित पाटणकर गटाला एकही सदस्य निवडून आणता आला नाही. त्यामुळे दोन सदस्य अपात्र ठरले तरी या ग्रामपंचायतीवर गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई गटाचीच सत्ता राहणार आहे. असे असले तरी दोन सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार पडल्याने राजकीय गोटात खळबळ उडाली आहे.या अपात्रतेच्या कारवाईवर संजय गांधी निराधार योजनेचे पाटण तालुका अध्यक्ष भरत साळुंखे यांनी हरकत घेत ग्रामविकास राज्य मंत्री यांच्याकडे  जात पडताळणी  प्रमाणपत्र सदर करत या कारवाई वरती स्थगिती आणण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे ही अपात्रतेची निवड रद्द होईल असे अध्यक्ष भरत साळुंखे यांचे म्हणणे आहे. याबाबत प्रशासन काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरShambhuraj Desaiशंभूराज देसाईpatan-acपाटण