सातारा : घराच्या आश्रयाला नि:शंक विसावा घ्यावा आणि तेच घर काळ बनून अंगावर कोसळावे, असाच काहीसा प्रकार साताऱ्यातील माचीपेठेत घडला. जुन्या घराच्या पडवीला झोपलेल्या यशोदा आत्माराम जाधव (वय ८०) व सोनुताई एकनाथ कदम (७०) या घराची भिंत अंगावर कोसळून गंभीररीत्या जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.माचीपेठेत ढोल्या गणपती मंदिरालगत ‘कृष्ण’ नावाचे १९५५ साली बांधलेले दुमजली घर आहे. परिसरातील नागरिकांनी सांगितलेल्या माहितीनुसार यशोदा जाधव व सोनुताई कदम या दोन वृद्ध बहिणी अनेक वर्षांपासून त्यांच्या माहेरच्या घरात राहतात. मागील बाजूस दुमजली आणि (पान ८ वर)ढोल्या गणपती मंदिरासमोर राहणारे विजय लांडगे आज, शुक्रवारी ‘मॉर्निंग वॉक’साठी घराबाहेर पडले होते. घटनाग्रस्त घरासमोरून जात असताना त्यांना महिलांच्या कण्हण्याचा आवाज ऐकू आला. त्यामुळे त्यांनी घराजवळ जाऊन कानोसा घ्यायचा प्रयत्न केला, तर या दोन महिला घरात मातीच्या ओल्या झालेल्या ढिगाऱ्याखाली पडल्या होत्या. त्यांनी तत्काळ नगरसेवक कल्याण राक्षे यांच्याशी संपर्क साधला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर राक्षेंसह नगराध्यक्ष सचिन सारस, रवींद्र माने यांनी कार्यकर्त्यांसोबत घटनास्थळी धाव घेतली. सकाळी सात वाजता या दोन्ही महिलांना बाहेर काढण्यात आले.
भिंत कोसळून दोन वृद्ध बहिणी जखमी
By admin | Updated: August 9, 2014 00:37 IST