शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात दोन बालविवाह रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 22:52 IST

सातारा : कोडोली येथील साईसम्राट मंगल कार्यालयात सुरू असलेला बालविवाह कार्यालयाचे मालक संजय निकम यांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला. वेळीच ...

सातारा : कोडोली येथील साईसम्राट मंगल कार्यालयात सुरू असलेला बालविवाह कार्यालयाचे मालक संजय निकम यांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला. वेळीच निकम यांनी याबाबत प्रशासनाला माहिती दिल्यामुळे दोन बालविवाह रोखण्यात प्रशासन यशस्वी झाले.याबाबत अधिक माहिती अशी, मंगळवारी कोडोली येथील साईसम्राट मंगल कार्यालयात दोन विवाहांचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी वधू वरांसह वºहाडी मंडळींही भल्या सकाळी कार्यालयात दाखल झाली. वºहाड सकाळी साडेदहा वाजता दाखल झाले. मंगल कार्यालयातील व्यवस्था चोख आहे का? हे बघण्यासाठी संजय निकम सवयीप्रमाणे कार्यालयात पोहोचले. कार्यालयात तेव्हा साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू होता. त्यावेळी दोन्ही नववधू त्यांच्या नजरेस पडल्या. वय लहान असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी नातेवाइकांकडे त्यांच्या वयाच्या दाखल्याची मागणी केली. सुमारे अर्धा तास टाळाटाळ झाल्यानंतर निकम यांनी आक्रमक पवित्रा घेऊन सर्व विधी थांबविण्याची भूमिका घेतली. त्यानंतर घाबरलेल्या मुलींच्या नातवाइकांनी मुलींचे वय लहान असल्याचे मान्य केले. यातील एकीचे वय १५ वर्षे तर दुसरीचे वय १७ वर्षे होते. निकम यांनी याबाबत प्रशासनाला माहिती देताच अकराच्या सुमारास प्रशासकीय फौज मंगल कार्यालयात दाखल झाली. सुमारे चार तास या सर्वांनी येथे थांबून हा विवाह रोखला आणि पालकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून समज देऊन त्यांना सोडले.या कारवाईसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा अ‍ॅड. मनीषा बर्गे, निवासी नायब तहसीलदार सुनील मुनाळे, सहायक पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी के. एम. चव्हाण यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. प्रशासनाला याबाबत माहिती देऊन दोन बालविवाह रोखल्याबद्दल मंगल कार्यालयाचे मालक संजय निकम यांचा सत्कार करण्यात आला.