शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

भीषण अपघात! फलटणमध्ये दोन कारची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू, ११ गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 23:24 IST

फलटण तालुक्यातील सुरवडी येथे भीषण अपघात; जखमींवर फलटण शहरात उपचार सुरू

फलटण: फलटण तालुक्यातील मौजे सुरवडी येथील फलटण- लोणंद महामार्गावर जगताप वस्ती नजीक भीषण अपघातात 2 जण जागीच ठार  तर 11 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

याबाबात घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की फलटण- लोणंद रोडवर जगताप वस्ती नजीक इंडिका कार एम. एच.14 एफ. सी. 1104 व तवेरा गाडी क्रमांक एम. एच 14 बी. ए. 5053 या गाडीचा समोरा समोर भीषण असा गंभीर स्वरूपाचा अपघात झाला आहे. अज्ञात कोणत्यातरी कामानिमित्ताने पुणे येथे गेली होती.

पुणे येथून परत येताना फलटण तालुक्यातील सुरवडी येथील फलटण-लोणंद रोडवर जगताप वस्ती येथे भीषण अपघात झाला असून यातील  गोट्या उर्फ सचिन भारत काळेल वय वर्षे 30 (रा. वळई, ता. माण, जि. सातारा) व शुभम केवटे वय वर्षे 28 (रा.संगमनेर, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) हे जागीच ठार झाले आहेत.

या अपघातात दैवत शामराव काळेल, वय- ३७, रा.वळई, ता. माण जि. सातारा),  मल्लिकार्जुन विरलप्पा शिरगुंडे, ६३, रा.गुलबर्गा, देवरवस्ती, मायनगर), सुवर्णा मल्लिकार्जुन शिरगुंडे,५५ (रा.गुलबर्गा,देवरवस्ती,मायनगर), गंगाधर गुंडप्पा बेळंबगी, पोर्णिमा गंगाधर बेळंबगी, व त्यांची मुलं रचित व रचना पुजा अरुण कुमार पाटील (रा.नंदनवन सोसायटी हिंजवडी पुणे) व त्यांची दोन मुले अद्विक व प्रणम्या हे तवेरा गाडीतील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर फलटण शहरातील लाईफ लाईन व निकोप हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यामधील काही लोक गंभीर जखमी झाले आहेत.