शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
4
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
5
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
8
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
9
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
10
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
11
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
12
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
13
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
14
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
15
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
17
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
18
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
19
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
20
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर

साताऱ्यात दोघे ताब्यात, दोन पिस्टल अन् तीन जिवंत काडतुसे जप्त

By नितीन काळेल | Updated: April 26, 2024 19:32 IST

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ,दीड वर्षात ८२ पिस्टल जप्त

सातारा : लोकसभा निवडणुकीमुळे जिल्ह्यात पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेने सातारा शहरात दोघांना ताब्यात घेऊन देशी बनावटीचे दोन पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे हस्तगत केली. तसेच या घटनेत एकूण दोन लाख रुपयांचा मुद्देमालही हस्तगत केला. या घटनेतील एक संशयित जावळी तालुक्यातील तर दुसरा सांगली जिल्ह्यातील आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलिस अधीक्षक समीर शेख व अतिरिक्त पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोम्बिंग ऑपरेशन राबवून तपासणीची सूचना स्थानिक गुन्हे शाखेला केली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहायक पोलिस निरीक्षक रोहित फार्णे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक करून कारवाईबाबत सूचना केलेली. गुरुवारी रात्रीच्या सुमारास हे पथक सातारा शहरातील गेंडामाळ परिसरात कोम्बिंग ऑपरेशन करत असताना पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना शाहूपुरी ते आदर्श काॅलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोघे जण दुचाकीवरून (एमएच, १०, ईएफ, ७६०४) गावठी बनावटीचे पिस्टल विक्री करण्यास येणार आहेत, अशी माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी सहायक पोलिस निरीक्षक फार्णे व पथकाला कारवाईची सूचना केली.

गुरुवारी रात्री ११ च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी ओंकार राजाराम काकडे (वय २१, रा. शिरटे, ता. वाळवा, जि. सांगली) आणि गोरख सीताराम महाडिक (वय ४०, रा. घोटेघर, ता. जावळी) यांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतल्यावर देशी बनाटवटीचे दोन पिस्टल, तीन जिवंत काडतुसे, एक रिकामे मॅग्झिन आणि दुचाकी असा १ लाख ९५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हाही नोंद करण्यात आला आहे.या कारवाईत पोलिस निरीक्षक देवकर, सहायक निरीक्षक फार्णे, सुधीर पाटील, पृश्वीराज ताटे, उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, मदन फाळके, तानाजी माने, हवालदार अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लैलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रवीण फडतरे, अमित झेंडे आदींनी सहभाग घेतला.

दीड वर्षात ८२ पिस्टल जप्त

सातारा जिल्हा पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळेच त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर कारवाई होताना दिसून येत आहे. २०२२ मधील नोव्हेंबरपासून आतापर्यंत पोलिसांनी देशी बनावटीचे ८२ पिस्टल, तीन बारा बोअर रायफल, १९४ जिवंत काडतुसे आणि ३७७ रिकाम्या पुंगळ्या जप्त केल्या आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsatara-pcसातारा