शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सांबराच्या शिंगाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

By दत्ता यादव | Updated: January 21, 2024 20:18 IST

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

दत्ता यादव/ सातारा: संरक्षित वन्यप्राणी असलेल्या सांबराच्या शिंगाची तस्करी करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून सांबराची दोन मोठी शिंगे हस्तगत करण्यात आली आहेत. ही कारवाई शनिवार, दि. २० रोजी सायंकाळी करण्यात आली.

नितीन आत्माराम जाधव (वय ३२, रा. गोसावीवाडी, ता. कऱ्हाड), अमोल सुरेश गायकवाड (वय ३८, रा. गायकवाड वाडी, ता. कऱ्हाड), अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची संशयितांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कऱ्हाड तालुक्यातील पेरले गावच्या हद्दीतील पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या सेवा रस्त्यावर दोन तरुण सांबर या वन्यप्राण्याच्या शिंगाची तस्करी व विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी तातडीने आपल्या पथकाला त्या ठिकाणी कारवाईसाठी पाठवले.

पथकातील पोलिसांनी साध्या वेशात त्या ठिकाणी सापळा लावला. त्यावेळी दुचाकीवरून दोन तरुण आले. त्यांच्याजवळ असलेल्या पोत्यामध्ये पोलिसांनी झडती घेतली असता त्यामध्ये सांबर या वन्यप्राण्याची दोन मोठी शिंगे आढळून आली. ही शिंगे पोलिसांनी हस्तगत केली. तस्करी करण्यासाठी वापरण्यात आलेल्या दुचाकीसह ५ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी त्यांच्याकडून हस्तगत केला. नितीन जाधव आणि अमोल गायकवाड या दोघांवर उंब्रज पोलिस ठाण्यात वन्यप्राणी अधिनियम १९७२ या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक आंचल दलाल, पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र भोरे, रोहित फार्णे, पोलिस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, फाैजदार सुधीरबनकर, हवालदार साबीर मुल्ला, सचिन झेंडे, अमृत कर्पे, शिवाजी भिसे, केतन शिंदे, धीरज महाडिक, पृथ्वीराज जाधव, मोहसीन मोमीन, स्वप्नील दाैंड यांनी ही कारवाई केली. 

सांबराची शिकार कोठे केली?

सांबराची शिंगे संशयितांनी नेमकी कोठून आणली व ती कोणाला विकण्यासाठी जात होते, याबाबत पोलिस त्यांच्याकडे कसून चाैकशी करत आहेत. सांबराची शिकार कोणत्या भागात करण्यात आली, हे सुद्धा तपासाअंती समोर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :satara-pcसाताराCrime Newsगुन्हेगारी