शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

वीज चोरीप्रकरणी वीस जणांविरुद्ध गुन्हा, पथके तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 10:22 IST

वीजबिलांच्या थकबाकीमुळे नियमानुसार वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही जिल्ह्यातील वीस वीजग्राहक विनापरवाना विजेचा वापर करीत असल्याचे आढळून आले. त्यांच्याविरुद्ध वीजचोरीचे कलम १३५ तसेच कलम १२६ नुसार कारवाई सुरूआहे. गेल्या तीन दिवसांत वेगवेगळ्या पथकांद्वारे वीजपुरवठा खंडित केलेल्या १२९६ थकबाकीदारांच्या वीजजोडण्यांची तपासणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देवीज चोरीप्रकरणी वीस जणांविरुद्ध गुन्हा, पथके तैनात वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही थकबाकीदारांकडून अनधिकृत वापर

सातारा : वीजबिलांच्या थकबाकीमुळे नियमानुसार वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही जिल्ह्यातील वीस वीजग्राहक विनापरवाना विजेचा वापर करीत असल्याचे आढळून आले. त्यांच्याविरुद्ध वीजचोरीचे कलम १३५ तसेच कलम १२६ नुसार कारवाई सुरूआहे. गेल्या तीन दिवसांत वेगवेगळ्या पथकांद्वारे वीजपुरवठा खंडित केलेल्या १२९६ थकबाकीदारांच्या वीजजोडण्यांची तपासणी करण्यात आली आहे.बारामती परिमंडल अंतर्गत सातारा व सोलापूर जिल्ह्यासह बारामती, इंदापूर, दौंड, शिरुर, भोर व पुरंदर या तालुक्यांमध्ये थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या ३७१९ वीज जोडण्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १९८ ठिकाणी थेट वीजचोरीद्वारे तसेच शेजाऱ्यांकडून वीज वापर सुरू असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येत आहे.वारंवार आवाहन करूनही वीजबिलांच्या थकबाकीची रक्कम न भरणाऱ्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील ग्राहकांचा नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम वेगाने सुरू आहे. तात्पुरता किंवा कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही थकबाकीदार अनधिकृतपणे विजेचा वापर करीत असेल तर त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित केल्याची महावितरणच्या प्रणालीमध्ये नोंद झाल्यानंतर अशा ग्राहकांच्या वीजजोडण्यांची प्रत्यक्ष तपासणी करण्यात येत आहे. यासाठी पुणे प्रादेशिक विभागासोबतच परिमंडल, मंडल व विभागस्तरावरील वेगवेगळी पथके तयार करण्यात आली आहेत व गेल्या तीन दिवसांपासून ही पथके सातारा जिल्ह्यात तपासणी करीत आहेत. रात्रीच्या कालावधीतसुद्धा ही तपासणी सुरू आहे.जिल्ह्यातील वाई, सातारा, वडूज, कऱ्हाड , फलटण या पाच विभागांमध्ये १२९६ वीजजोडण्यांची तपासणी करण्यात आली. यात थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही आठ ठिकाणी थेट वीजचोरीद्वारे तर बारा ठिकाणी शेजाऱ्यांकडून वीज वापर सुरू असल्याचे आढळून आले. त्यांच्याविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येत आहे.बिल भरणासाठी आधुनिक प्रणालीचालू व थकीत वीजबिलांचा भरणा करण्यासाठी अधिकृत वीजबिल भरणा केंद्र, ई-वॉलेटची सोय उपलब्ध आहे. तसेच चालू व थकीत वीजबिलांचा घरबसल्या भरणा करण्यासाठी वेबसाईट तसेच मोबाईल अ‍ॅपद्वारे ऑनलाईन सोय उपलब्ध आहे. वीजबिलांच्या थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी संपूर्ण थकीत रकमेचा त्वरित भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणSatara areaसातारा परिसर