शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

चोवीस तासांत दहा हजार कापडी पिशव्या मागणी वाढली : बचत गटांना मिळाला रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 23:52 IST

राज्य सरकारने प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी घातल्यापासून बचत गटांच्या महिलांसह लहान-मोठ्या व्यावसायिकांनी कागदी व कापडी पिशव्या तयार करण्याचे उद्योग वेगाने सुरूकेले आहेत.

ठळक मुद्देसांगली, कोल्हापूर अन् कोकणातही निर्यात

प्रशांत कोळी ।सातारा : राज्य सरकारने प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी घातल्यापासून बचत गटांच्या महिलांसह लहान-मोठ्या व्यावसायिकांनी कागदी व कापडी पिशव्या तयार करण्याचे उद्योग वेगाने सुरूकेले आहेत. दिवसाला तब्बल दहा हजार कापडी पिशव्यांची निर्मिती होत आहे. सातारा जिल्ह्यासह सांगली, कोल्हापूर अन् कोकणातूनही या पिशव्यांना मागणी वाढली आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे व जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या निर्देशानुसार आरोग्य विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, आरएसईटी प्रशिक्षण केंद्र आणि आयडीबीआयतर्फे कागदी व कापडी पिशव्यांचे प्रशिक्षण दिले जात आहे. आता नव्या विचारांनी आणि नव्या पद्धतीने स्वत:चे वेगळेपण सिद्ध करण्यासाठी या महिला कापडी पिशव्यांचे विक्रमी उत्पादन करत आहेत. सध्या जिल्ह्यात बचतगटांच्या माध्यमातून तयार होणाऱ्या पिशव्यांच्या किमती आठ रुपयांपासून ते ११० रुपयांपर्यंत आहेत. सातारा शहरासह इतर शहरांमध्येही या पिशव्यांना मागणी वाढली आहे. मागणीनुसार वेगवेगळ्या आकाराच्या आणि नक्षीकाम केलेल्या पिशव्या बचत गट तयार करून देत आहेत.

जिल्ह्यातील सैदापूर, साप, क्षेत्र माहुली, सोनगाव, खेड, लोणंद, म्हसवड, जकातवाडी, करंडी, वडूज, पुसेगाव, खटाव, कातरखटाव, क्षेत्र महाबळेश्वर, मारुल हवेली, पाटण, लिंब गोवे आदी ठिकाणी कागदी व कापडी पिशव्यांची निर्मिती केली जात आहे. एका ठिकाणांहून दररोज पाचशे ते हजार पिशव्या तयार केल्या जात आहे. सांगलीसह मिरज, कोल्हापूर, चिपळूण, इचलकरंजी आदी ठिकाणांहून या पिशव्यांना मोठी मागणी आहे. प्लास्टिक बंदीच्या निर्णयानंतर बचत गटांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.महाबळेश्वरला दिवसाला दोन हजार मागणीमहाराष्ट्राचे नंदनवन म्हणून समजल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची संंख्या वाढत आहे. दररोज हजारो पर्यटक या ठिकाणी भेटी देत असतात. या ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आणल्यापासून महाबळेश्वरमध्ये दररोज दोन हजार कागदी व कापडी पिशव्यांची मागणी होत आहे. यापुढेही संख्याही वाढण्याची शक्यता आहे.गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही कापडी व कागदी पिशव्या बनविण्याचे काम करीत आहोत. प्लास्टिक बंदीच्या निर्णयानंतर या उद्योगाला खºया अर्थाने गती मिळाली आहे. सध्या या पिशव्यांना प्रचंड मागणी असून, महिलांसाठी हा रोजगार उत्तम पर्याय ठरणार आहे.    - विद्या भोसले, सातारामहिलांनी पातळ साड्या, कॅनव्हॉस आणि मांजरपाट आदी कपड्यापासून पिशव्या तयार करण्यावर भर दिला आहे.या कापडी पिशव्यातही वेगळेपण जपणाºया खादी पिशव्याही या बचत गटाच्या महिला तयार करत आहेत.पांढºया शुभ्र खादीच्या पिशव्याही तयार केल्या जात आहेत. सर्वसामान्य पिशव्यांपेक्षा थोडीसी महाग असणारी ही पिशवी पाहताक्षणी पसंत पडते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरbusinessव्यवसाय