शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सावकाराच्या त्रासाला कंटाळून व्यावसायिकाचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 23:53 IST

कºहाड : खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून गॅरेज व्यावसायिकाने औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. संबंधितावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, याप्रकरणी सावकारावर कºहाड शहर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.अब्दुल दस्तगीर मुजावर (वय ३६, रा. व्यंकटेश प्लाझा, मलकापूर) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्याचे नाव आहे. तर आसिफ मुलाणी (रा. मुजावर कॉलनी, ...

कºहाड : खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून गॅरेज व्यावसायिकाने औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. संबंधितावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, याप्रकरणी सावकारावर कºहाड शहर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.अब्दुल दस्तगीर मुजावर (वय ३६, रा. व्यंकटेश प्लाझा, मलकापूर) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्याचे नाव आहे. तर आसिफ मुलाणी (रा. मुजावर कॉलनी, कºहाड) या सावकारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलकापूर येथील व्यंकटेश प्लाझामध्ये अब्दुल मुजावर हा वास्तव्यास आहे. त्याच्यासह वडील, भाऊ हे गॅरेज चालवतात. जुन्या कार खरेदी-विक्रीचा व्यवसायही अब्दुल करतो. दोन वर्षांपूर्वी त्याची मुजावर कॉलनी येथील आसिफ मुलाणी याच्याशी ओळख झाली. ओळखीतून २०१७ मध्ये अब्दुल मुजावर याने मुलाणी याच्याकडून एक लाख रुपये व्याजाने घेतले. मुलाणी याने त्यावेळी कोऱ्या स्टॅम्पवर अब्दुल मुजावर याच्या सह्या घेतल्या. त्यानंतर जानेवारी २०१८ मध्ये अब्दुलने मुलाणीला ७० हजार रुपये दिले. मात्र त्याने ७० हजार रुपये व्याजात जमा केले, असे म्हणून पुन्हा अब्दुलकडे एक लाख रुपयांची मागणी केली. पैशांसाठी वारंवार फोन करून धमक्या दिल्या. त्याच्या तगाद्याला कंटाळून अब्दुलने कºहाड सोडून बेळगावात कार चालवली. तेथे पाहुण्यांकडून व कार चालवून ४० हजार रुपये एका महिन्यात जमवले. ते पैसे घेऊन अब्दुल मलकापुरात आला. ४० हजार रुपये त्याने मुलाणीला दिले. मात्र, तरीही मुलाणी प्रत्यक्ष भेटून व फोनवरून पुन्हा एक लाख रुपयांसाठी धमक्या देत होता.त्याच्या धमक्यांमुळे टेन्शन आल्याने अब्दुलने १ आॅक्टोबर रोजी घरात तापावरच्या व पित्तावरच्या चार गोळ्या, दोन औषधाच्या बाटल्या एकदम पिल्या. एकदम औषधे पिल्याने त्याला चक्कर आली. कुटुंबीयांनी त्याला वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी अब्दुलची विचारपूस करून खासगी सावकारी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार आसिफ मुलाणी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.