शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
5
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
6
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
7
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
8
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
9
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
10
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
11
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
12
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
13
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
14
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
15
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
16
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
17
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
18
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
19
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
20
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी

काशीळला बँक फोडण्याचा प्रयत्न

By admin | Updated: December 1, 2014 00:05 IST

रोकड सुरक्षित : सीसीटीव्हीत चोरट्याची छबी कैद

काशीळ : सातारा तालुक्यातील काशीळ येथे राष्ट्रीय महामार्गालगत असलेली बँक आॅफ महाराष्ट्रची शाखा फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न काल, शनिवारी रात्री झाला. बँकेतील रोकड सुरक्षित असून, एका चोरट्याची छबी बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.बँकेचे शाखा व्यवस्थापक आणि बोरगाव पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महामार्गालगत असणाऱ्या बँकेच्या शाखेजवळ राहणारे कुटुंब काल रात्री साडेअकराच्या दरम्यान आपल्या नातेवाइकांना सोडण्यासाठी बँकेजवळ आले असता, एक व्यक्ती बँकेच्या कुंपणामधून घाईगडबडीत बाहेर पडताना दिसला. जवळ जाऊन त्याला हटकले असता तो पळून जाऊ लागला. तरीही ग्रामस्थ आणि जवळील ढाब्याच्या व्यवस्थापकांनी महामार्गावर ट्रकला हात करताना त्याला पकडले आणि चौकशी केली. त्यावेळी उडवाउडवीची उत्तरे देऊन, खोटे नाव सांगून त्याने पोबारा केला.रविवारी सकाळी सातच्या सुमारास बँकेच्या पुढील बाजूस असणाऱ्या दोन्ही शटरची कुलपे तोडून बँक फोडण्याचा प्रयत्न केल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यावर खळबळ उडाली. शाखाधिकाऱ्यांनी ही माहिती बोरगाव पोलिसांना देताच पोलीस कर्मचारी घटनास्थळी आले. त्यांनी बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पाहिले असता अंदाजे ३८ ते ४० वर्षांच्या चोरट्याची छबी त्यात आढळून आली. दरम्यान, बँकेच्या परिसरात एक दुचाकी (एमएच ११ एएच ९१३३), लोखंडी गज, कटावणी आढळून आली. ग्रामस्थांनी पकडलेल्या इसमाने दुचाकी आपली नसल्याचे सांगितले होते. मात्र, काही वेळातच त्याच दुचाकीच्या डिकीतून साहित्य बाहेर काढताना याच इसमाला पाहून ग्रामस्थांनी त्याचा पाठलाग केला. मात्र, चोरटा पळून जाण्यात यशस्वी ठरला. सुरक्षा रामभरोसे...काशीळमध्ये शासकीय आणि सहकारी तीन बँका आहेत. बँकांच्या दहा ते पंधरा फुटांवरून महामार्ग जातो. मात्र, बँकांच्या परिसरात कोणतीही सुरक्षा नसल्याने शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करून बँकेत जमा केलेल्या पैशांची सुरक्षा रामभरोसे आहे.