शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

काढणीवेळच्या पावसाने घेवडा अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 16:25 IST

कोरेगावच्या घेवड्याला देशभरात नावलौकिक मिळाला. दिल्ली दरबारात मानाचे स्थान असलेल्या घेवडा यंदा ऐन काढणीवेळी आलेल्या पावसामुळे अडचणीत आला आहे. पिकांचे नुकसान झाले असून, मळणीपासून ते विक्रीपर्यंत खर्च तरी निघेल का नाही? ही चिंता सतावत आहे.

ठळक मुद्देकोरेगावच्या राजमाचे नुकसान मळणीपासून ते विक्रीपर्यंतचा खर्च परवडेनाओल्या घेवड्यावर बुरशीउत्पादन खर्च परवडेना

पिंपोडे बुद्रुक (सातारा),5  : कोरेगावच्या घेवड्याला देशभरात नावलौकिक मिळाला. दिल्ली दरबारात मानाचे स्थान असलेल्या घेवडा यंदा ऐन काढणीवेळी आलेल्या पावसामुळे अडचणीत आला आहे. पिकांचे नुकसान झाले असून, मळणीपासून ते विक्रीपर्यंत खर्च तरी निघेल का नाही? ही चिंता सतावत आहे.

घेवड्याचे आगार म्हणून परिचित असलेल्या कोरेगाव तालुक्यातील उत्तरेकडील परिसरात खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामांत घेवड्याचे उच्चांकी उत्पादन घेतले जाते. यावर्षी खरीप हंगमातही घेवड्याची मोठ्या प्रमाणावर पेरणी झाली. परंतु ऐन काढणी काळात पडलेल्या पावसामुळे घेवड्याचे मोठे नुकसान झाले.

परिसरात आणखी काही ठिकाणी घेवडा काढणी तसेच मळणीचे काम सुरू आहे. पावसाच्या मिळालेल्या उघडीनंतर काढलेला घेवडा शेतकºयांनी झाकून ठेवलेला असला तरी आर्द्रतेमुळे त्यावर बुरशीचा प्रार्दुभाव झाला आहे. तसेच त्याला कोंब आले आहेत. पावसात भिजल्याने घेवड्याची मळणी करणे देखील त्रासदायक झाले आहे. एकूणच पावसामुळे घेवड्याचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय मळणी केलेला घेवडा लाल पडल्याने व्यापाºयांनी मालाकडे पाठ फिरविली. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. ओल्या घेवड्यावर बुरशीमळणीनंतर ओलसर घेवडा पोत्यात भरला असता ते दडपून त्यावर बुरशीचा प्रार्दुभाव होतो. त्यासाठी घेवडा हवेशीर पसरून ठेवणे गरजेचे आहे. ओलसर घेवडा वाळविण्यासाठी उन्हात पसरला असता तो आणखी लाल पडण्याची शक्यता असते. त्यामुळे ओला घेवड्याचे करायचे काय? असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. उत्पादन खर्च परवडेनामजुरांच्या मागणीच्या तुलनेत अपुरा पुरवठा, पावसामुळे होणारा कामाचा खोळंबा. परिणामत: वाढता मजुरी खर्च, वाहतूक खर्च, खते, बी-बियाणे, औषधे यांच्या वाढत्या किमती यामुळे घेवड्याचा उत्पादन खर्च वाढत आहे. याउलट घेवड्याला प्रतीकिलो मिळणारा ३० ते ३५ रुपये दर यामुळे उत्पादन खर्चही परवडत नाही. - सुरेश पवार,नांदवळ, ता. कोरेगाव