शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॉलीला लाल पट्टी.. अपघाताला सुटी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 23:24 IST

सातारा : साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू असून, रात्रीच्यावेळी ऊस वाहतूक करणाºया वाहनांच्या अपघाताची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. असे अपघात टाळण्यासाठी ‘लोकमत’च्या पुढाकाराने वात्सल्य सामाजिक संस्था व धर्मवीर युवा मंच यांच्या सहकार्यातून शेंद्रे येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात ऊस वाहतूक करणाºया वाहनांना रेडियम बसविण्याच्या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.सध्या जिल्ह्यातील ...

सातारा : साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू असून, रात्रीच्यावेळी ऊस वाहतूक करणाºया वाहनांच्या अपघाताची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. असे अपघात टाळण्यासाठी ‘लोकमत’च्या पुढाकाराने वात्सल्य सामाजिक संस्था व धर्मवीर युवा मंच यांच्या सहकार्यातून शेंद्रे येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात ऊस वाहतूक करणाºया वाहनांना रेडियम बसविण्याच्या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.सध्या जिल्ह्यातील उसाचा गळीत हंगाम जोरात सुरू आहे. सर्व कारखान्यांत ऊस गाळपासाठी ट्रक, ट्रॅक्टर व बैलगाडी अशी हजारोवाहने ऊस भरून धावत आहेत. जिल्ह्यात आज सहकारी व खासगी अशा एकूण १५ साखर कारखान्यांमध्ये गाळप सुरू असून, त्यासाठी पाच हजारांहून अधिक वाहनांतून ऊस वाहतूक केली जाते. रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक करण्यात येते. ही उसाची वाहतूक धोकादायक ठरत असते. कारण अनेक ऊस वाहतूक वाहनांना रिफ्लेक्टर नसल्यामुळे रात्रीच्या वेळी पाठीमागून वाहने धडकतात. त्यामुळे अपघात होऊन मृत व जखमींची संख्या वाढत आहे.अजिंक्यतारा कारखाना परिसरात मंगळवारी सकाळी ‘लोकमत’च्या पुढाकाराने वात्सल्य सामाजिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष शशिकांत पवार, उपाध्यक्ष रणजित सावंत, सचिव प्रवीण कासकर, अशोक शिंदे, सोमनाथ शिराळ, मंगेश जाधव, जाफरखान मुल्ला, गणपत शिंदे, केशव सांभारे, रणजित सावंत, विकास बाबर, प्रकाश जाधव, धर्मवीर युवा मंचचे अध्यक्ष प्रशांत नलवडे, प्रसन्ना जाधव, सत्यम कदम, सागर फडतरे, आकाश घाड़गे, अतुल घाड़गे, शुभम कदम व सहकाºयांनी ऊस वाहतूक करणाºया ट्रॅक्टर चालकांना थांबवून ट्रॉलीच्या पाठीमागील बाजूस व अ‍ॅक्सलला रिफ्लेक्टर व रेडियम लावले. त्यावेळी अनेक ट्रॅक्टर व ट्रॉलीवर रेडियम नसल्याने निदर्शनास आले. रेडियमपट्टी लावल्यानंतरट्रॅक्टर चालकांनी ‘लोकमत’च्या उपक्रमाचे कौतुक करून समाधान व्यक्त केले.साताºयातील वात्सल्य सामाजिक सेवाभावी संस्था, धर्मवीर युवा मंचने या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यासाठी या संस्थांनी ऊस वाहतूक वाहनांसाठी रेडियम पुरविणे व लावण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या माध्यमातून ऊस वाहतूक करणाºया वाहनांच्या अ‍ॅक्सलला रेडियम लावण्यात येणार आहे.अपघात रोखण्यास होणार मदतऊस तोड मजुरांनी दिवसभर तोडलेला ऊस सायंकाळी ट्रक किंवा ट्रॉलीमध्ये भरला जातो. त्यानंतर ऊस वाहतूकदार सायंकाळी उसाच्या फडातून कारखान्याकडे उसाची वाहतूक केली जाते. उसाचा ओव्हरलोड असल्याने कायम सावकाश चालवावी लागतात. रेडियम नसल्याने पाठीमागून येणारी वाहने ट्रॉलीला धडकतात. त्यामुळे झालेल्या अपघातास ऊस वाहतूक करणाºया चालकास जबाबदार धरले जाते. रेडियम लावल्याने काही प्रमाणात अपघात रोखण्यास मदत होणार आहे.सहभागी होण्याचे आवाहनदेगाव फाटा येथील जगदंब क्रिएशन आणि पी. के. सेल्स येथेही वाहनधारकांसाठी रेडियम मोफत देण्याची व्यवस्था या संस्थांनी केली आहे. या संस्थांच्या माध्यमातून अधिकाधिक वाहनांना रेडियम लावण्याचा प्रयत्न आहे. ‘लोकमत’च्या पुढाकारातून व संस्थांच्या सहकार्यातून ही मोहीम सुरू करण्यात आली असून यामध्ये विविध सामाजिक संस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.