शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

सिलिंडर वाहतूक करणाऱ्या ट्रकला आग

By admin | Updated: November 27, 2014 00:23 IST

पसरणी घाटातील दुर्घटना : प्रशासनाच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ

वाई : वाई-पाचगणी दरम्यान असणाऱ्या पसरणी घाटात आज (बुधवारी) दुपारी तीनच्या सुमारास गॅस सिलिंडरने भरलेल्या ट्रकला अचानक आग लागली. ट्रक चालकाकडून या दुर्घटनेची माहिती समजताच वाई पालिकेच्या अग्निशामक दलाने घटनास्थळी येऊन आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास वाई औद्योगिक वसहातीतील एका पेट्रोलियम कंपनीचा गॅस सिलिंडरने भरलेला ट्रक (एमएच १० झेड १११३) वाईहून पाचगणीकडे चालला होता. ट्रक पसरणी घाटात बुवासाहेब मंदिराजवळ आला असता, ट्रकच्या बॅटरीतून अचानक धूर येऊ लागला. हा धूर चालकाच्या निदर्शनास येताच त्याने तत्काळ ट्रक जागेवर थांबविला व संंबधित कंपनीला या घटनेची माहिती दिली. यानंतर संबंधित कंपनीने तत्काळ वाई पालिकेच्या अग्निशामक दलास या घटनेची सूचना दिली. अग्निशामक दलाच्या कर्मचारीऱ्यांनी घटनास्थळी येऊन ट्रकला लागलेली आग एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आटोक्यात आली. कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.पसरणी घाटातून महाबळेश्वर, पाचगणीला जाण्यासाठी एकमेव मार्ग असल्याने या मार्गावर वाहनांची नेहमीच वर्दळ असते. गॅस सिलिंडरने भरलेला ट्रक अचानक पेट घेतल्याने या मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांमध्ये घबराट पसरली होती. या घटनेमुळे पसरणी घाटात काहीकाळ वाहतूक देखील ठप्प झाली होती. (प्रतिनिधी)