शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासी म्हणे... एसटीचे खासगीकरण नको रे बाबा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2021 14:30 IST

जगदीश कोष्टी सातारा : प्रवासी हेच दैवत समजून एसटीने गेल्या सात दशकांहून अधिक काळ प्रवाशांची सेवा बजावली. उत्पन्नापेक्षा समाज ...

जगदीश कोष्टीसातारा : प्रवासी हेच दैवत समजून एसटीने गेल्या सात दशकांहून अधिक काळ प्रवाशांची सेवा बजावली. उत्पन्नापेक्षा समाज हिताला प्राधान्य देत अनेक योजना राबविल्या. याच एसटीच्या खासगीकरणाचा विचार समोर येत आहे, असे झाल्यास गरीब रथ हा सर्वसामान्यांचा राहणार नाही. त्यामुळे एसटीचे खासगीकरण नको रे बाबा, असे प्रवाशी म्हणत आहेत.एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघत नसल्याने खासगीकरणाची चाचपणी सुरू झाली. त्यामुळे एसटीचे कर्मचारी धास्तावले आहेत, तेवढाच प्रवाशांना हादरा बसला आहे. कारण एसटीचे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे जेवढे एसटीवर प्रेम आहे, त्यापेक्षा जास्त सर्वसामान्य प्रवाशांचे आहे. कारण या एसटीने त्यांना कायमे भरभरून दिले आहे. महाबळेश्वर, जावळी, पाटण तालुक्यातील दऱ्याखोऱ्यातील गावांना एसटीने जोडून ठेवले आहे. खेड्यापाड्यांतील लोकांना शहरी भागातील झगमगाट दाखविला... प्रवाशांची लूट होणार - - एसटीत खासगी शिवशाही दाखल झाल्या, यामुळे प्रवाशांना सुखसोयी, वातानुकूलित गाड्या, मोबाइल चार्जर आदी सुविधा मिळाल्या.- पण तेवढाच प्रवासही महागला. एसटीचे प्रवासी सर्वसामान्य आहेत. त्यांना जादा पैसे देऊन प्रवास करणे परवडणारे नाही. त्याचप्रमाणे विविध घटकांतील लोकांना प्रवासात सवलत मिळेल याची खात्री नाही.एसटी वाचायला हवी..

एसटी ही सर्वसामान्यांना परवडणारी प्रवासी साधन आहे. गाव तिथं एसटी पोहोचली आहे. त्यामुळे एसटी वाचणे आवश्यक आहे. गुरुनाथ कदम,प्रवासी.  

कोरोनापूर्वी एसटीचे सुरळीत चालले होते. त्यानंतर वाईट दिवस आले आहेत. म्हणून खासगीकरण करणे पर्याय ठरू शकत नाही.- लालसिंग परदेशी, प्रवासी.  

राज्य शासनाने एसटी कर्मचाऱ्यांना काही ना काही देण्याचा प्रयत्न केला आहे. कर्मचाऱ्यांनीही आता तुटेपर्यंत ताणने योग्य ठरणार नाही.- दिगंबर जाधव,प्रवासी.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरST Strikeएसटी संपpassengerप्रवासी