शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
5
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
6
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
7
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
8
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
9
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
10
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
11
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
12
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
13
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
14
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
15
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
16
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
17
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती
18
कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!
19
पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!
20
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या यशानंतर लक्ष्यला लागली मोठी लॉटरी, धर्मा प्रॉडक्शनचा चौथा सिनेमा केला साइन

परदेशी पर्यटकांचे रिक्षातून भारतभ्रमण

By admin | Updated: January 7, 2015 23:26 IST

ये जिंदगी ना मिलेगी दोबारा : भुर्इंजमधील मिसळचा यथेच्छ पाहुणचार

भुर्इंज : आयर्लंडमधील एक तरुण व तीन तरुणी आॅटोरिक्षातून भटकंती करत आहेत. केरळहून राजस्थानकडे जाताना या चौघांनी भुर्इंजमध्ये यथेच्छ पाहुणचार घेत आपल्या या अनोख्या रिक्षाप्रवासाची माहितीही ‘लोकमत’शी दिली. ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या चित्रपटातील मित्रांच्या भटकंतीची आठवण करून देणारी परदेश तरुण-तरुणींची भटकंती मंगळवार, दि. ६ रोजी भुर्इंजकरांनी अनुभवली. रिक्षातून भटकंती करणारे हे परदेशी पाहुणे भुर्इंज परिसरात चर्चेचा विषय ठरले. पूर्व आयर्लंडच्या किलडेअर येथील रॉस मॅकमॅहन या तरुणासह मध्य आयर्लंडमधील आओफ डोहरसी, पूर्व आयर्लंडमधील विकलो येथील मायरेड डोहरसी, पश्चिम आयर्लंडमधील नाईम्ह फेगारसी या तीन तरुण गेली पंधरा दिवस भारतभ्रमण करत आहेत. या रिक्षातून हे चौघे केरळ, कर्नाटक आणि गोवा पाहून आता महाराष्ट्रात आले आहेत. येथून ते गुजरातमार्गे राजस्थानला जाणार आहेत. हे चौघेही इंजिनिअर असून, बीएमस, लिंक्टन, सिमेन्स, स्ट्रायकर अशा नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी करत आहेत. हे चौघे कॉलेज जीवनातील मित्र असून, आयुष्य वाचविण्यासाठी ते भारत दौऱ्यावर पर्यटनासाठी आले आहेत. भारत अधिक जवळून पाहता यावा, यासाठी त्यांनी रिक्षातून प्रवास करण्यास सुरुवात केली आहे. या दौऱ्यात त्यांना भारताबद्दल अतिशय चांगले अनुभव आले आहेत. येथील अन्नपदार्थांची तर त्यांना भुरळच पडली आहे. मसाला डोसा, पनीर, आलूपालक, हैद्राबादी बिर्याणी अशी अस्सल भारतीय पदार्थांची नावे धडाधड सांगत त्यांनी भुर्इंजमधील एका हॉटेलमध्ये झणझणीत मिसळवर यथेच्छ ताव मारला. भारतीय फूड ‘स्पायसी’ असले तरी ‘डिलिशियस’ आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले. रिक्षासारखी बंद पडत असल्याने प्रवासात व्यत्यय येत असला तरीही भारतातील लोक प्रेमळ असून, मदत करत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. (वार्ताहर)अतिथी देवो भव : रिक्षातून आलेल्या परदेशी पाहुण्यांना पाहण्यासाठी चांगलीच गर्दी झाली होती. सुरुवातीला त्यांना येथे संवाद साधताना खूपच अडचणी आल्या. काही हॉटेलमधून ते भाषेच्या अडचणीमुळे बाहेरही पडले. मात्र, राजन जाधवराव यांनी त्यांचा उडालेला गोंधळ पाहून त्यांच्याशी इंग्रजीमधून संवाद साधला आणि नंतर या परदेशी तरुणांना भुर्इंजकरांच्या अतिथी देवो भव: या भावनेची प्रचिती आली. आओफ डोहरसी, मायरेड, नाईम्ह फेगारसी या तिघींनंी भारतीय जेवण, निसर्गसौंदर्य खूपच छान असून, येथील गाई खूपच आवडल्याचे सांगितले. रॉस याने भारताबद्दल जेवढं वाचलं होते, त्यापेक्षा भारत कितीतरी पटीने सुंदर देश असल्याचे सांगितले.