शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक पोलिसांची गांधीगिरी..!

By admin | Updated: February 12, 2015 00:37 IST

सुरक्षेचा संदेश : स्वत:पासून हेल्मेट वापरण्यास सुरुवात; जनजागृतीच्या दिशेने एक पाऊल पुढे

सातारा : स्वसंरक्षणसाठी दुचाकीधारकांनी हेल्मेटचा वापर करणे गरजेचे आहे. मात्र, दुचाकीधारक या नियमांची पायमल्ली करताना दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी चक्क वाहतूक पोलिसांनी स्वत:पासून सुरुवात करून नित्यनियमाने हेल्मेट वापरण्यास सुरुवात केली आहे.शासनाने हेल्मेट सक्ती केली असली तरी जिल्ह्यात अजूनही हेल्मेटच्या वापराबाबतत उदासीनता दिसून येत आहे. याला वाहनचालकांची मानसिकता जबाबदार असल्याचे दिसून येत आहे. हीच मानसिकता बदलण्यासाठी आता वाहतूक पोलिसांनी स्वत:पासून सुरुवात केली आहे. वाहतूक पोलीस आता हेल्मेटशिवाय बाहेर पडत नाहीत. विशेष म्हणजे, वाहतूक शाखेने चक्क हेल्मेटचा वापर न करणाऱ्या आपल्याच सहकाऱ्यावर कारवाई करून हेल्मेट किती नितांत गरजेचे आहे, याची शिस्त घालून दिली आहे. या कारवाईची धास्ती घेऊन पोलिसांनी आता स्वत:च्या सुरक्षेसाठी व इतरांना सुरक्षेबाबत जागृत करण्यासाठी डोक्यावर हेल्मेट परिधान केले आहे.काही कर्मचाऱ्यांना पोलीस प्रशासनाच्या वतीने हेल्मेट देण्यात आले आहेत. तर काहीनी स्वत: हेल्मेट विकत घेतली आहे. एका बाजूला पोलीस प्रशासन सुरक्षेबाबत सतर्क होत असताना इतर नागरिक मात्र याबाबत अजूनही उदासीन आहेत. काही वाहनचालक केवळ पोलिसांचा दंड चुकविण्यासाठी हेल्मेटचा वापर करतात. मात्र, असे न करता स्वत:च्या सुरक्षेची काळजी घेऊन ‘आपले आयुष्य आपल्या हाती’ या योजनेत सहभागी व्हावे, एवढीच अपेक्षा पोलिसांची आहे. (प्रतिनिधी)न वापरण्याचे तोटे धुळीमुळे श्वसनाचे विकार डोळ्यांना त्रासहवेचा कर्ण पलटलांवर परिणामअपघातात डोक्याचा इजा होण्याची अधिक शक्यताअसे झाल्यास स्मृतिभ्रंश होऊ शकतो गंभीर दुखापत असल्यास मृत्यूही होऊ शकतोवापराचे फायदे जिल्ह्यामध्ये वर्षभरात सुमारे दोनशे दुचाकी अपघात झाले असून,अनेक वाहनचालकांना डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने प्राण गमवावे लागले आहे. मानवी शरीरात मेंदू हा अतिसंवेदनशील घटक आहे. अपघातात डोक्याला इजा झाल्यास मेंदूतून रक्तस्त्राव होतो, तर संबंधित व्यक्तीचा स्मृतिभ्रंश होऊ शकतो. दुखापत गंभीर असल्यास मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हेल्मेट वापरामुळे हा धोका टळू शकतो.