शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

महाबळेश्वरमध्ये बाजारपेठेत जाणाऱ्या वाहनांना ब्रेक; व्यापारी, पर्यटकांमध्ये समाधान 

By दीपक शिंदे | Updated: November 24, 2023 17:57 IST

उपाययोजनांमुळे वाहतुकीला लागली शिस्त

महाबळेश्वर : महाबळेश्वर बाजारपेठेतील वाहतुकीला कोणी शिस्त लावयची, याबाबत पालिका आणि पोलिस प्रशासन यांच्यात वाद होता; परंतु आंदोलनामुळे जबाबदारी कोणाची, या प्रश्नाचा निकाल लागला असून या दोन्ही विभागांनी समन्वय साधून केलेल्या उपाययोजनांमुळे बाजारपेठेतील वाहतुकीला शिस्त लागली आहे. बाजारपेठ वाहनमुक्त झाल्याने व्यापारी व पर्यटकांतून समाधान व्यक्त होत आहे.वाहतूक शिस्तीला दृष्ट लावण्याचा प्रयत्न सुरू झाला होता. बॅरिकेट्समुळे ज्या व्यापाऱ्यांची वाहने बाजारपेठेत येऊ शकत नाही, अशा काही मंडळींनी बाजारातील वाजती घंटा हाताशी धरून वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी लावण्यात आलेल्या बॅरिकेट्सबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला होता. तसेच या बॅरिकेट्सचा पर्यटकांना त्रास होत होता. बाजारात येण्यासाठी मंदिराच्या दर्शन रांगेप्रमाणे रांगा लागत होत्या. बाजारातून पुन्हा बेशिस्त वाहतूक सुरू करणाऱ्यांना मोकळे सोडायचे का? बॅरिकेट्सऐवजी पोलिस बंदोबस्त लावा, असाही उपाय सुचविण्यात आला होता. परंतू, पोलिस कर्मचारीच उपलब्ध नसल्याने बाजारपेठेतून वाहतुक सुरू झाली. बाजारपेठेतील वाहतुकीबाबत जी मंडळी अपप्रचार करून अतिक्रमण वाढल्याचे सांगत आहेत, ती मंडळी वाहतूक आणि अतिक्रमण या दोन्ही समस्यांची गल्लत करीत आहेत. अतिक्रमणासाठी प्रशासनाने वेळीच उपाययोजना केलीच पाहिजे; परंतु बॅरिकेट्समुळे अतिक्रमण वाढल्याचा जावई शोध लावू नये, अशा प्रतिक्रियाही काही व्यापाऱ्यांमधून उमटल्या. मात्र हा प्रश्न अखेर निकाल लागला असून या दोन्ही विभागांनी समन्वय साधून केलेल्या उपाययोजनांमुळे बाजारपेठेतील वाहतुकीला शिस्त लागली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानMarketबाजार