शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
3
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
4
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
5
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
6
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
7
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
8
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
9
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
10
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
11
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
12
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
13
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
14
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
15
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
16
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
17
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
18
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
19
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
20
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव

दिसला ट्रॅक्टर की कर हात; दिसली चेसी की लाव स्टिकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 23:42 IST

सातारा : सातारा शहरालगतच्या राष्टÑीय महामार्गावर गेल्या दोन दिवसांपासून वेगळंच दृश्य दिसतंय. ‘दिसला ट्रॅक्टर की कर हात... खाली वाकल्यानंतर दिसली चेसी की लाव स्टिकर,’ अशी मोहीम कार्यकर्त्यांकडून अत्यंत नियोजनबद्धरीत्या राबविली जातेय. ‘लोकमत’च्या पुढाकारातून वात्सल्य अन् धर्मवीर या दोन संस्थांचे कार्यकर्ते ऊस वाहतूक करणाºया प्रत्येक ट्रॅक्टर-ट्रॉलीजला लाल रेडियम लावण्यात गुंतलेत.पहिल्या दिवशी ...

सातारा : सातारा शहरालगतच्या राष्टÑीय महामार्गावर गेल्या दोन दिवसांपासून वेगळंच दृश्य दिसतंय. ‘दिसला ट्रॅक्टर की कर हात... खाली वाकल्यानंतर दिसली चेसी की लाव स्टिकर,’ अशी मोहीम कार्यकर्त्यांकडून अत्यंत नियोजनबद्धरीत्या राबविली जातेय. ‘लोकमत’च्या पुढाकारातून वात्सल्य अन् धर्मवीर या दोन संस्थांचे कार्यकर्ते ऊस वाहतूक करणाºया प्रत्येक ट्रॅक्टर-ट्रॉलीजला लाल रेडियम लावण्यात गुंतलेत.पहिल्या दिवशी जवळपास दोनशेपेक्षा अधिक ट्रॅक्टर-ट्रॉलीज्ना रेडियम लावण्यात आले होते. दुसºया दिवशी म्हणजे बुधवारी हायवे परिसरातील जवळपास तीनशे ट्रॅक्टर-ट्रॉलीज् थांबवून त्यांनाही लाल पट्टी चिकटविण्यात कार्यकर्त्यांना यश आले. गेल्या दोन दिवसांतील आकडा जवळपास पाचशे इतका गेला असून, पुढील टप्प्यात जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील इतर उत्साही कार्यकर्त्यांचा सहभाग या मोहिमेत वाढविला जाणार आहे.वात्सल्य सामाजिक सेवा संस्था अन् धर्मवीर युवा मंचचे कार्यकर्ते मोफत रेडियम पुरवित असून, जिल्ह्यातील बहुतांश ट्रॅक्टर-ट्रॉलीजला् स्वत:हून लाल स्टिकर लावण्यावर भर दिला जात आहे. या ट्रॅक्टर-ट्रॉलीज्ना रिफ्लेक्टर नसल्यामुळे पाठीमागून आदळणाºया वाहनांच्या अपघातांचे प्रमाण वाढले होते. हे अपघात टाळण्यासाठी ‘लोकमत’च्या पुढाकारातून या दोन संस्थांनी ही मोहीम राबविली आहे. वाहनांना रेडियम नसल्याने अनेकवेळा वाहतूक पोलिसांकडून कारवाई होत असते. ट्रॅक्टर-ट्रॉलीला रेडियम लावल्याने पोलिसांकडून होणाºया कारवाईतून सुटका होणार आहे.तुम्हीही उतरू शकता या मोहिमेत..सातारकरांचे प्राण वाचविण्यासाठी सुरू केलेल्या या सामाजिक मोहिमेत तुम्हीही उतरू शकता. तुमची संस्था अथवा संघटना असेल तर साधा संपर्क. आपल्याला दिले जातील मोफत रेडियम, स्टिकर. आपणही लावू शकता गावोगावच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीज्ना हे रेडियम.. अन् वाचवू शकता लोकांचे प्राण. विशेष म्हणजे आपल्या या सामाजिक उपक्रमाचे छायाचित्रही ‘लोकमत’मध्ये केले जाईल प्रसिध्द. मग विचार कसला करताय ‘उचला मोबाईल... करा कॉल.’ 9850 384 376