शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

टोल ५५ अन् खड्डे ५५ हजार!

By admin | Updated: August 7, 2014 00:15 IST

महामार्ग गेला खड्ड्यात! : पैसे देऊन दुखणं विकत घेतल्याच्या वाहनचालकांमधून प्रतिक्रिया

सातारा : एखाद्या शहराचा विकास करायचा असेल तर सर्वात प्रथम तेथील दळणवळणाची व्यवस्था दर्जेदार असायला हवी. सातारच्याबाबतीत मात्र उलटेच घडत आहे. दुपदरी महामार्गाचे चारपदरीकरण झाले. सहापदरीकरणाचे कामही सुरू झाले, मात्र पुढचे पाठ मागचे सपाट याप्रमाणे महामार्गाची एवढी दयनीय अवस्था झाली आहे की, खेड्यापाड्यातले रस्ते बरे, असे म्हणण्याची वेळ आली आहे. महामार्गाची ऐशी-तैशी झाली तरी वाहनधारकांकडून टोल मात्र सहापदरीकरणाचा वसूल केला जात आहे. सहापदरीकरणाचे काम बंद...महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम गेल्या दीड वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी खोदकाम, साईडपट्ट्यांची अर्धवट कामे अपघातास निमंत्रण देत आहे. सहापदरीकरणाचा टोल वसूल केला जातो, मात्र तशा सुविधा मिळत नसल्याने मरणयातना सहन कराव्या लागत आहेत.सेवारस्त्यांची ऐशी-तैशीशिरवळ : शिरवळला येताय? थांबा, अन्यथा अपघात होऊ शकतो, असे म्हणण्याची वेळ सध्या शिरवळकरांवर आली आहे. महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्सच्या कृपेने महामार्ग व सेवारस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. खड्ड्यांतून महामार्ग शोधावा लागत आहे. पावसामुळे महामार्ग आणि गावांना जोडणाऱ्या सेवारस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. शिरवळ येथे तर कोणता खड्डा चकवू, अशी अवस्था वाहनचालकांची होत आहे. पावसाचे पाणी खड्ड्यांत साठल्यामुळे वाहनचालकांची मोठी पंचाईत होत आहे. खड्डे मुजविण्याचा प्रयत्न केला आहे. पण अवघ्या दोन तासांतच जैसे थे परिस्थिती झाली आहे.