शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

‘सातारा लोकमत’चा आज तपपूर्ती वर्धापन दिन सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 00:46 IST

सातारा : चोखंदळ वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असलेल्या ‘सातारा लोकमत’च्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवार, दि. १५ रोजी सायंकाळी पाच ते रात्री नऊ या वेळेत राधिका चौकातील राधिका संकुलमध्ये वाचकांचा स्नेहमेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.सातारा जिल्ह्याच्या लौकिकास साजेसे कार्य केलेल्यांना ‘लोकमत’ने कायमच प्रकाशझोतात ...

सातारा : चोखंदळ वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असलेल्या ‘सातारा लोकमत’च्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवार, दि. १५ रोजी सायंकाळी पाच ते रात्री नऊ या वेळेत राधिका चौकातील राधिका संकुलमध्ये वाचकांचा स्नेहमेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.सातारा जिल्ह्याच्या लौकिकास साजेसे कार्य केलेल्यांना ‘लोकमत’ने कायमच प्रकाशझोतात आणण्याचे कार्य केले आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्याच्या जडणघडणीच्या दृष्टीने ‘लोकमत’ने आपल्यातीलच रोलमॉडेल समाजासमोर आणले आहेत. त्यातूनच ‘गुड न्यूज’ सातारकरांसाठी घेऊन येण्याची परंपरा ‘लोकमत’ने साताऱ्यात रुजवली. या उपक्रमाचे वाचकांनी नेहमीच स्वागत केले आहे.जिल्ह्यातील साखर कारखान्यांना ऊस वाहतूक करणाºया अनेक ट्रॅक्टर ट्रॉलींना रिफ्लेक्टर नसल्यामुळे अपघात होत होते. त्यामुळे ’लोकमत’च्या पुढाकारातून अनेक सामाजिक संघटनांनी जवळपास पाच हजार ट्रॉलींना मोफत रेडियम बसविले. त्यानंतर ऊस वाहतूक करणाºया टॅÑक्टरच्या अपघातांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले. सकारात्मक बातम्या देत असतानाच समाजात चाललेल्या गैरकृत्यांवरही तिसरा डोळा ठेवण्याचे काम ‘लोकमत’ने केले आहे. त्यामुळे अनेक ‘इनिशिएटिव्ह’ला यश आले आहे.यामुळेच ‘लोकमत’वरील वाचकांचे प्रेम आणि विश्वास वृद्धिंगत झाला आहे. हे प्रेम आणखी जोपासण्यासाठी मंगळवारी सायंकाळी पाच ते रात्री नऊपर्यंत स्नेहमेळावा आयोजित केला आहे.