शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

बाबासाहेबांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेण्याची आज संधी

By admin | Updated: December 5, 2014 23:17 IST

पावले तरडगावकडे : महापरिनिर्वाणदिनानिमित्त अभिवादन रॅली

तरडगाव : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थिकलश असलेल्या फलटण तालुक्यातील निंभोरे या गावी जिल्ह्यातील बौद्ध अनुयायी शनिवार दि. ६ डिसेंबर या महापरिनिवाणदिनी डॉ. आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी एकत्र येणार आहेत. दोन वर्षापूर्वी प्रतिचैत्यभूमी म्हणून नावारुपास आलेल्या निंभोरे या गावी अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी प्रत्येक वर्षी होणारी वाढती गर्दी पाहता भविष्यात तेथील परिसराचा विकास करून भव्य स्मारक उभारण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.फलटण तालुक्यातील निंभोरे या गावचे रहिवाशी सीताराम कांबळे, रामू कांबळे, शिवराम कांबळे हे डॉ. आंबेडकरांच्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईला गेले असताना त्या काळी त्यांनी बाबासाहेबांच्या काही अस्थी आपल्या गावी आणल्या होत्या. निंभोरे येथील बुद्ध विहारामध्ये डॉ. आंबेडकरांचा अस्थिकलश आहे. हे जिल्ह्यातील बहुतांश अनुयायांना माहित नव्हते. मात्र सन २०१२ मध्ये ६ डिसेंबर या दिनी तेथे तालुक्यातील विविध गावातील भीम सैनिकांनी निंभोरे गावापर्यंत अभिवादन रॅली काढुन अस्थिकलशाचे दर्शन घेतले. त्यावेळी विविध संघटनानी एकत्र येवून दरवर्षी महापरिनिर्वाणदिनी अभिवादन करण्यासाठी निंभोरे येथे येण्याचा संकल्प केला. अन् तेव्हापासून निंभोरे हे गाव प्रतीचैत्यभूमी म्हणून नावारुपास येवू लागले. जिल्ह्यातील अबाल वृद्ध, लहान मुले यांना मुंबई याठिकाणी लाखोंच्या गर्दीमध्ये दर्शन घेणे शक्य नाही. त्यांच्यासाठी हे गाव भविष्यात सोयीस्कर ठरणार आहे. त्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या बुद्ध विहार परिसराचा सर्वांगीण विकास होणे आवश्यक आहे. (वार्ताहर)