शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी साताऱ्यात १३ एप्रिलला ‘मानवी साखळी’चे आयोजन 

By नितीन काळेल | Updated: April 8, 2024 19:13 IST

सातारा : लोकसभा निवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध पातळीवर प्रयत्न सुरू असून आता १३ एप्रिलला ’मानवी साखळी’ ...

सातारा : लोकसभा निवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध पातळीवर प्रयत्न सुरू असून आता १३ एप्रिलला ’मानवी साखळी’ तयार करुन आवाहन करण्यात येणार आहे. यामध्ये तरुण, खेळाडू, नागरिक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग राहणार आहे. हा उपक्रम सर्व तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी होणार आहे.सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जाहीर झालेली आहे. यासाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. तसेच माढा लोकसभा मतदारसंघातही सातारा जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहे. यासाठी मतदारांत जनजागृती केली जात आहे. तसेच मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी १३ एप्रिलला सकाळी ७ ते ९ या वेळेत जिल्ह्यातील सर्व तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी ‘मानवी साखळी’चे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये तरुणवर्ग, खेळाडू, महाविद्यालयीन विद्याऱ्थी, स्वयंसेवक, शासकीय-निमशासकीय अधिकारी, कर्मचारी, सर्व वयोगटातील नागरिक आदींचा सहभाग घेण्यात येणार आहे.

या मानवी साखळीत भारताचा नकाशा तयार करण्यात यावा अशा सूचना आहेत. तसेच भारताचा नकाशा तयार करताना मानवी साखळीच्या दोन ओळी असाव्यात. यामध्ये भारताचा राष्ट्रीय ध्वजच्या तिरंगामधील रंगाचा वापर करावा. प्रत्येक व्यक्तीने पांढरा शर्ट घातलेला असावा, संपूर्ण नकाशाभोवती चारही बाजुंनी विद्याऱ्श्यांच्या निळ्या रंगाच्या टोप्या घातलेल्या एक ओळीने चाैरस तायार करावा, अशा काही सूचना करण्यात आलेल्या आहेत.

तालुक्याच्या ठिकाणी एकाचवेळी आयोजन..दि. १३ एप्रिलला सर्व तालुक्याच्या ठिकाणी सकाळी बरोबर साडे आठ वाजता एकाचवेळी ‘मानवी साखळी’चे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या ठिकाणी माईक, स्पीकर, मंडप, ड्रोन कॅमेरा, पिण्याचे पाणी आदींची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच कार्यक्रमावेळी ढोल-ताशा पथक, कलापथक, मतदार जागृतीबाबत बलून सोडणे आदींचेही नियोजन करण्यात येणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरVotingमतदान