शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

काळोशीच्या डोक्यावर शिळांचा ‘काळ’

By admin | Updated: July 30, 2015 00:29 IST

ग्रामस्थांची पुनर्वसनाची मागणी : वर्षभरानंतरही गावावरील संकटाची परिस्थिती ‘जैसे थे’

प्रगती जाधव-पाटील -सातारा -वाघजाई देवीच्या छत्रछायेखाली वसलेल्या परळी खोऱ्यातील काळोशी गावावर चार भल्या मोठ्या शिळा काळ म्हणून उभ्या राहिल्या आहेत. गतवर्षी माळीणच्या घटनेनंतर ‘लोकमत’ने लक्ष वेधले आणि प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी येथे जुजबी पाहणी केली. मात्र, वर्षभरात कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे धक्कादायक चित्र एक वर्षाने पाहायला मिळाले.परळी खोऱ्यातील काळोशी हे अडीचशे उंबऱ्यांचे गाव. सुमारे बाराशे लोकसंख्या असणाऱ्या या गावाच्या उत्तरेस यवतेश्वर गाव डोंगरमाथ्यावर वसले आहे. त्या डोंगराचा काही भाग ढिसाळ झाला असून, तो दिवसेंदिवस सुटत चालला आहे. त्यापासून गावात मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत बरेचसे छोटे-मोठे दगड खाली येऊन गावाच्या वरच्या बाजूस असलेल्या ओढा किंवा कडे-कपारीत येऊन अडकले आहेत. मात्र, त्यामुळे काही मोठ्या प्रमाणावर नुकसान अथवा हानी झाली नाही.गेल्या अनेक वर्षांपासून या डोंगरावरील काही शिळा निसटण्याच्या अवस्थेत आहेत. खूप वर्षांपूर्वी हा दगड गावावर कोसळणार होता. पण गावकऱ्यांचे रक्षण करण्यासाठी वाघजाई देवी प्रकटली. देवीने हा दगड हाताने अडविला. तेव्हापासून कितीही मोठ्ठा पाऊस असला तरीही या शिळा तसूभरही हालल्या नाहीत, अशी ग्रामस्थांची भाबडी श्रद्धा आहे. या दगडावर वाघजाई देवीच्या हाताचा पंजा दिसत असल्याचेही ग्रामस्थ सांगतात. काळोशी गाव तीव्र उतारावर वसले आहे. या गावातील ९० टक्के चाकरमानी मुंबईस्थित आहेत. लहरी पावसाच्या जिवावर येथील शेती फुलते. त्यामुळे दिवसभर गावात ज्येष्ठ आणि लहानग्यांचा वावर अधिक असतो. या डोगरावरील शिळा गेल्या काही वर्षांत निसटू लागल्या आहेत. जोरदार पाऊस सुरू झाला तर अनेक मोठे दगड कपारीतून ओघळून खाली देवीच्या मंदिरापर्यंत आले आहेत. डोंगरावरील निसटलेल्या अवस्थेत असलेल्या शिळा एका जोरदार पावसाच्या सरीत कोसळण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. मोठ्या पावसाने जर या शिळा खाली आल्या तर तीव्र उतार आणि जडत्वाच्या नियमानुसार अतिवेगाने या शिळा अवघ्या गावावर वरवंटा फिरवून पुढे जाऊ शकतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी होण्याची शक्यता आहे. देवीवर अपार श्रध्दा असलेले येथील ग्रामस्थ आजही ‘देवी आमच्यावर संकट येऊ देणार नाही,’ हे खूप आत्मविश्वासाने सांगतात. पण, निसर्गाने रौद्ररूप धारण केले तर होत्याचे नव्हते व्हायला वेळ लागणार नाही, हेही ग्रामस्थांच्या अंतमर्नात कोरलेले आहे. काय व्हायला हवे...काळोशी गावाच्या डोंगरावरील शिळा कोणत्याही मोठ्या पावसाने कोसळू शकतात. त्यामुळे येथे तज्ज्ञांच्या सल्ल्याने कार्यवाही होणे आवश्यक आहे. तातडीने निधी उपलब्ध करून प्रशासनाने शिळांमधील वाढत चाललेल्या फटींमध्ये काँक्रिटीकरण करून वरून जाळी बसविणे अपेक्षित आहे. तसेच देवळाच्या वरील बाजूस संरक्षक जाळी बसविण्याचीही मागणी आहे. काय झाले वर्षभरात...पुणे जिल्ह्यातील माळीण येथील दुर्घटना घडल्यानंतर ‘लोकमत’ने जिल्ह्यातील काही गावांची पाहणी केली होती. सातारा तालुक्यातील काळोशी हे गाव धोक्याच्या सावटाखाली होते. ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर प्रशासनाने दोन अधिकारी पाठवून पाहणी केली. त्यानंतर वर्षभरात येथे काहीही झाले नाही.रात्रीच्या वेळी पाऊस सुरू झाल्यानंतर खूप भयंकर आवाज येतो. जोराच्या पावसाच्या रेट्यात कधी एखादा छोटा दगड खाली गडगडत आला तरीही त्याचा अत्यंत भीषण आवाज येतो. या आवाजाने गावकरी भयग्रस्त होतात.- अमोल निकम, अध्यक्ष, तंटामुक्त समितीकाळोशीच्या डोंगरावरील चार शिळा कोणत्याही क्षणी गावावर येऊ शकतात. प्रशासनाने गावाचे पुर्नवसन करावे; अन्यथा या शिळांना जाळी बसवून त्यांना खाली येण्यापासून अडविणे आवश्यक आहे. - सोमनाथ पवार, पं. स. सदस्यगावावरील हे डोंगरी संकट दूर करण्यासाठी आम्ही प्रशासनाला लेखी कळविले आहे. पण त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही. या शिळांमुळे अवघ्या गावाला जिवाचा धोका आहे.- यशवंत निकम, सरपंच