शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

बाकी साडेचार वर्षे यांनाच हुडकायची वेळ जनतेवर येते, शिवेंद्रसिंहराजेंचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2022 11:15 IST

सातारा : काही लोकांना नागरिकांच्या प्रश्नांचे काहीही देणेघेणे नसते. पण, निवडणूक जवळ आली की, अशा लोकांना राजकीय स्वार्थ स्वस्थ ...

सातारा : काही लोकांना नागरिकांच्या प्रश्नांचे काहीही देणेघेणे नसते. पण, निवडणूक जवळ आली की, अशा लोकांना राजकीय स्वार्थ स्वस्थ बसू देत नाही आणि मग हेच लोक जनतेबद्दल खोटा कळवळा आणून मोठमोठ्या थापा मारतात. मात्र जनता सुज्ञ झाल्याने अशा भूलथापांना भुलण्याचे दिवस गेले आहेत, असे उद्गार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काढले.शाहूपुरीसाठीच्या कण्हेर पाणी पुरवठा योजनेच्या जलपूजन आणि लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते पाच सुवासिनींना जलकुंभ देऊन या योजनेचे लोकार्पण करण्यात आले. तसेच सुमारे दहा वर्षांपूर्वी दूषित पाण्यामुळे मृत्यू पावलेल्या सात महिन्यांच्या गर्भवती भगिनीच्या पवित्र स्मृतीस ही योजना समर्पित करण्यात आली.यावेळी नगरसेवक अविनाश कदम, शाहूपुरी ग्रामविकास आघाडीचे भारत भोसले, उप कार्यकारी अभियंता माने, योजनेचे अभियंता एस. आर. अग्रवाल, मेंटेनन्स प्रमुख आवळे, योजनेचे ठेकेदार दीपक भिवरे, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्रकुमार मोहिते ,नवनाथ जाधव, सुहास वहाळकर उपस्थित होते.कण्हेर धरण बांधकामावेळी स्व. भाऊसाहेब महाराजांनी दूरदृष्टी ठेवून भविष्यात सातारा शहर व परिसरासाठी कण्हेरच्या पाण्याची गरज लागू शकते, यासाठी धरणस्थळी स्वतंत्र तांत्रिक तरतूद केल्यानेच आज एवढ्या सहजासहजी या पाणी योजनेचा लाभ होत आहे.मध्यंतरीच्या काळात दिलीप सोपल पाणीपुरवठामंत्री असताना ही ३१ कोटींची योजना मी स्वतः पाठपुरावा करून मंजूर करून घेतली होती. सुदैवाने लोकवर्गणीची अट रद्द झाल्याने ही योजना मार्गी लागण्यातील मुख्य अडथळा दूर होऊन नंतर लागणारा अतिरिक्त १२ कोटींचा निधी सुध्दा राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून मंजूर करून घेतला व त्याची फलश्रुती म्हणून आज या योजनेचे पाणी प्रत्यक्षात शाहूपुरीत येऊन दाखल झाले आहे.काहींना विकासाशी काहीही घेणे-देणे नाही. यांना नागरिक फक्त निवडणूक आली की दिसतात, बाकी साडेचार वर्षे यांनाच हुडकायची वेळ जनतेवर येत असते, असेही आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसले