शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

स्वबळाच्या घोषणेनं ‘वाघांची डरकाळी’ स्वतंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 00:42 IST

जयदीप जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्करहिमतपूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली असल्याने सातारा जिल्ह्यातील अनेक इच्छुक दंड थोपटून कामाला लागणार आहेत. विविध विधानसभा मतदार संघांतून पक्षातील अनेकजण इच्छुकअसून, त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळे येत्या काहीकाळातच शिवसेनेची डरकाळी घुमणार असून, ...

जयदीप जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्करहिमतपूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली असल्याने सातारा जिल्ह्यातील अनेक इच्छुक दंड थोपटून कामाला लागणार आहेत. विविध विधानसभा मतदार संघांतून पक्षातील अनेकजण इच्छुकअसून, त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळे येत्या काहीकाळातच शिवसेनेची डरकाळी घुमणार असून, जिल्ह्यातील राजकीय चित्र बदलल्याचे दिसून येणारआहे.शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील अनेक मावळ्यांना, मातब्बरांना ताकद देऊन शिवसेनेत मानाचे स्थान दिले. त्यामुळे शिवसेना तळागाळात मूळ धरू लागली. मात्र, महाराष्ट्रात एकहाती सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न अधुरे राहिले. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील शिवसेनच्या पदाधिकाºयांनीही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी अनेकजण इच्छुक आहेत. त्यासाठी ते जोरदार तयारी करू लागले आहेत. तसेच अनेक मातब्बर शिवसेनेत प्रवेश करून निवडणूक लढवू शकतात, अशीही स्थितीआहे.मागील लोकसभा निवडणुकीत मुंबईतील उद्योगपती असलेले संभाजी सपकाळ हे साताºयातून लढण्यासाठी इच्छुक होते. मात्र, युतीमध्ये ‘रिपाइं’ला सातारा लोकसभा मतदार संघाची जागा गेली. ‘रिपाइं’चे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांना उमेदवारी मिळाली. परिणामी सपकाळ यांना माघार घ्यावी लागली. परंतु आगामी लोकसभा निवडणुकीसाठी साताºयातून संभाजी सपकाळ हे शिवसेनेचे उमेदवार असू शकतात, असा अंदाज बांधला जात आहे. तसेच शिवेसनेचे माजी जिल्हाप्रमुख व भाजपमध्ये गेलेले पुरुषोत्तम जाधव यांनी घरवापसी केली तर तेही दावेदार ठरु शकतात.गेल्या विधानसभा निवडणुकीत सातारा-जावळी मतदार संघातून माजी आमदार दगडूदादा सपकाळ लढले होते. मात्र, त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. तसेच फलटणमधून डॉ. नंदकुमार तासगावकर, वाईतूनडी. एम. बावळेकर, कोरेगावमधून हणमंत चवरे, माणमधून रणजितसिंह देशमुख, कºहाड उत्तरमधून नरेंद्र पाटील, कºहाड दक्षिण मतदारसंघातून अजिंक्य पाटील यांनापराभवाचा सामना करावा लागला होता. फक्त पाटण मतदार संघातून आमदार शंभूराज देसाई विजयीझाले होते. त्यांच्या रुपानेचजिल्ह्यात शिवसेनेचा एकमेव आमदार आहे.२०१९ मध्ये होणाºया विधानसभा निवडणुकीसाठी साताºयातून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, सखाराम पार्टे यांच्यापैकी एक उमेदवार असू शकतो. वाई मतदार संघातून डी. एम. बावळेकर, संभाजी सपकाळ. फलटणमध्ये इतर पक्षात नाराज असलेले तसेच शिवसेनेत येण्यास इच्छुक नावाजलेला उमेदवार असू शकतो.माणमधून रणजितसिंह देशमुख, रंगकामगार सेनेचे धनाजी सावंत. कोरेगावमधून पुरुषोत्तम माने, हणमंत चवरे, रणजितसिंह भोसले. कºहाड दक्षिणमधून जिल्हाप्रमुख भानुप्रताप उर्फ हर्षल कदम, कºहाड उत्तरमधून तालुकाप्रमुख किरण भोसले यांना उमेदवारी मिळू शकते.आदेश आला तर बानुगडे-पाटील लढणार...लोकसभा, विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांना पुन्हा पूर्वीच्या संपर्कप्रमुख पदावर कायम ठेवले आहे. मुलुखमैदान तोफ असणाºया बानुगडे-पाटील यांच्यावर उद्धव ठाकरे यांचा विश्वास आहे. त्यामुळे ‘मातोश्री’वरून आदेश आला तर बानुगडे-पाटील हे सातारा लोकसभा किंवा कºहाड उत्तर विधानसभा मतदार संघातून लढू शकतात.कोल्हापुरात सहा तर साताºयात एकच आमदार...कोल्हापूर जिल्ह्यात दहा विधानसभा मतदारसंघ असून, सहा ठिकाणी शिवसेनेचे आमदार आहेत. सांगली जिल्ह्यात आठ मतदारसंघ असून, एका ठिकाणी तसेच साताºयातही आठपैकी एका ठिकाणी शिवसेनेचा आमदार आहे.