शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

तारळी धरणाला वर्षात गळती!

By admin | Updated: November 28, 2014 00:09 IST

कोट्यवधी रुपये पाण्यात : वर्षापूर्वी लोकार्पण झालेल्या धरणाच्या कामाविषयी संभ्रमावस्था

एकनाथ माळी - तारळे  -वर्षापूर्वी मोठा गाजावाजा करून लोकार्पण केलेल्या तारळी धरणाला गळती लागली आहे. त्यामुळे धरणाच्या कामाविषयी तर्कविर्तक लढविले जात आहेत. दरम्यान, सिंचन घोटाळ्याची चर्चा सुरू होताच, कमकुवत धरणांच्या यादीत तारळीचाही समावेश होता. त्यावेळी झालेल्या आरोपांना पुष्टी देणारी ही घटना आहे.मुरुड गावच्या पश्चिमेला १९९८ मध्ये हजारो लोकांचे पुनर्वसन करून तारळी धरणाच्या बांधकामाला सुरुवात झाली. धरणाचे काम पूर्ण होण्यास २०१३ हे वर्ष उजडावे लागले. धरणात ५.८५ टीएमसी पाणी साठवण क्षमता आहे. धरणग्रस्थांच्या पुनर्वसनाचे प्रश्न आजही अधांतर आहे. परराज्यातील ठेकेदारांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून चुकीच्या पद्धतीने काम केले. कामाचा दर्जा ढासळल्यानेच धरणात एक वर्षांत गळती लागल्याचे सांगितले जात आहे.तारळी धरणावरून, बाजूने किंवा भिंतीजवळ जाऊन बघितल्यास धरणाच्या गळतीचे भयावह दृश्य पाहण्यास मिळते. धरणाच्या डाव्या बाजूला पडणाऱ्या प्रवाहाशेजारी तळातून, गॅलरीतून व इतर ठिकाणी तसेच धरणाच्या इतर उजव्या बाजूला गळती दिसून येत आहे. उजव्या बाजूच्या गॅलरीतून वाहणारे पाणी तोंडोशी बाजूने रस्त्याकडेने वाहत आहे. गळती झालेले पाणी नदीस मिळून अंदाजे एक टीएमसीच्या आसपास असल्याची माहिती पर्यटकांमधून सांगितले जात आहे. धरणाला लागलेली गळती काढण्यासाठी काढण्यासाठी कृष्णा खोरेच्या अधिकाऱ्यांनी कोणतीच हालचाल न केल्याने त्यांच्याकडे संशयाची सुई जात आहे. गळतीबाबत अधिकाऱ्यांनी मौन बाळगल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांला माहिती देऊनही दखल घेतली जात नाही. धरणाचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदारांना गळती काढण्यासाठी रीतसर सूचना दिल्या आहेत. पावसामुळे रखडलेले काम लवकरात लवकर सुरू होईल. राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी त्यांना अंतिम बिले दिली नाहीत.- एस. आर. पाटील, अभियंता