शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

तलाठ्याला मारहाण करणाऱ्याला तीन वर्षे शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 10:28 IST

सातारा : वाळूचा अवैध उपसा सुरू असलेल्या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी गेलेल्या तलाठ्याला मारहाण करणाऱ्या श्रीधर उर्फ बाळू कल्याण खराडे (रा. ...

ठळक मुद्देतलाठ्याला मारहाण करणाऱ्याला तीन वर्षे शिक्षावाळूचा अवैध उपसा सुरू असलेल्या ठिकाणी पंचनामा

सातारा : वाळूचा अवैध उपसा सुरू असलेल्या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी गेलेल्या तलाठ्याला मारहाण करणाऱ्या श्रीधर उर्फ बाळू कल्याण खराडे (रा. ताथवडा, ता. फलटण) याला न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. याप्रकरणी तलाठी आत्माराम नाना गिऱ्हे (रा. गोळीबार मैदान, सातारा) यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.याबाबत अधिक माहिती अशी, ताथवडा येथील पुलाजवळ २३ फेब्रृवारी २०१६ रोजी झालेल्या अवैध वाळू उपशाचा पंचनामा करण्यासाठी तत्कालीन गाव कामगार तलाठी आत्माराम गिऱ्हे हे त्यांचे सहकारी दत्तात्रय जाधव यांच्यासमवेत घटनास्थळी गेले होते.

त्यावेळी आरोपी खराडे याने त्यांना पंचनामा करण्यास विरोध केला. त्यावर गिऱ्हे यांनी आपण शासकीय काम करत असल्याचे सांगत पंचानम्याला सुरूवात केली. त्यामुळे चिडलेल्या खराडेने गिऱ्हे यांच्या डोक्यात दगड मारून त्यांना जखमी केले होते.

जखमी गिऱ्हे यांना फलटण येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर गिऱ्हे यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात श्रीधर खराडे याच्याविरोधात मारहाणीची तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी खराडेवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा व मारहाणीचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती.या खटल्यात श्रीधर खराडे याच्याविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सरकारी वकिलांनी केलेला युक्तीवाद व फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप, उपनिरीक्षक एस.के. शिंगटे यांची साक्ष या खटल्यात महत्त्वपूर्ण ठरली.

न्यायाधीश एन. एल. मोरे यांनी श्रीधर खराडेला तीन महिने सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड तसेच दंड न दिल्यास १५ दिवस साधी कैद, अशी शिक्षा सुनावली. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून हवालदार मुस्ताक शेख यांनी काम पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालयSatara areaसातारा परिसर