सातारा : गुडघा दुखीचे औषध पिल्याने महाबळेश्वर येथील एका तीन वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यासीन रऊफ डांगे असं या मुलाचं नाव आहे. रऊफ डांगे यांच्या घरातील फ्रिजमध्ये पाणी पिण्याच्या बाटलीत गुडघा दुखीचे औषध ठेवलं होतं. यासीनला तहान लागल्याने त्याने गुरुवारी दुपारी फ्रिजमधील बाटली घेतली. त्यातील औषध त्याने पाणी म्हणून प्यायलं. त्यानंतर काही वेळाने त्याच्या तोंडाला फेस येऊन तो बेशुद्ध पडला. घडलेला प्रकार पाहून कुटुंबीयांनी तातडीने त्याला महाबळेश्वर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर सातारा येथे शासकीय रुग्णालयात घेऊन जात असताना त्याचा मृत्यू झाला. याबाबत महाबळेश्वर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
पाण्याच्या बाटलीतील गुडघादुखीचं औषध पिऊन तीन वर्षाच्या मुलाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2018 13:22 IST